Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘मिस पुणे फेस्टिव्हल’ च्या कृष्णा वैद्य या मानकरी

Date:

पुणे

३० व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे संपन्न झालेल्या ‘मिस पुणे फेस्टिव्हल’स्पर्धेत कृष्णा वैद्य यांनी प्रथम क्रमांक मिळवून मानाचा मुकुट मिळवला.द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे काविया ज्योती व सिम्रन नाईक यांना मिळाला. पुणे फेस्टिवल चे मुख्य संयोजक कृष्णकांत कुदळे व उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी विजेत्यांचा सत्कार केला.याबरोबरच बेस्ट स्माईल,बेस्ट हेअरबेस्ट फिटनेस मॉडेल,  मिस फेवरेट आणि मिस फोटोजेनिकच्या मानकऱ्यांची देखील निवड करण्यात आली असून बेस्ट स्माईल – सानिया चौधरी,बेस्ट हेअर- रुची हेंद्रे , बेस्ट फिटनेस मॉडेल- पूजा मिरारी, मिस फेवरेट – स्नेहल खोमणे आणि मिस फोटोजेनिक-सृष्टी गव्हांडे यांची निवड करण्यात आली.अभिनेत्री प्राजक्ता माळी,युनायटेड नेशन्स ग्लोब डॉ राधिका वाघ आणि संयोजिका सुप्रिया ताम्हाणे यांच्या हस्ते या पाचही विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी मुख्य संयोजक कृष्णकांत कुदळे,उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे,अभिनेत्री प्राजक्ता माळी,मॉडेल अभ्यंग कुवळेकर,मोहन टिल्लू,श्रावणक्वीन तन्वी माने,दिग्दर्शक देवेंद्र शिंदे, दिग्दर्शक प्रशांत गिरकर, युनायटेड नेशन्स ग्लोब डॉ.राधिका वाघ आदी उपस्थित होते.या संपूर्ण स्पर्धेचे शो डिरेक्टरफॅशन कोरिओग्राफी व ग्रूमिंग मेंटॉर म्हणून जुई सुहास यांनी काम पाहिले.पुणे फेस्टिव्हलतर्फे सुप्रिया ताम्हाणे यांनी या स्पर्धेचे संयोजन केले.

     गेली ६ वर्षे सुरु असणाऱ्या या स्पर्धेत यंदा १८ ते २५ वर्षे वयोगटातील १०० युवतींनी सहभाग घेतला होता.त्यातील २० युवतींची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आली.या २० युवतींचे चालणे,बोलणे,हसणे,रॅम्प वॉक,केशरचना,पोशाख,सर्व सामान्यज्ञान आदी सर्व बाबींचे प्रशिक्षण जुई सुहास यांनी वेगवेगळ्या सेशनमध्ये करून घेतले.आज झालेल्या अंतिम फेरीत या २० युवतींनी रॅम्प वॉक केला.त्यावेळी पहिल्या फेरीत खिंन-ख्वाब ही बनारसी ड्रेस थीम होती. त्यातून 10 युवतींची निवड केली गेली. पुढच्या फेरीसाठी हवायन थीम होती.या 10 स्पर्धकांसाठी स्पिरिट बाय शा या बुटीकचे इविनिंग गाऊन्स देण्यात आले होते. धागा डिझायनर स्टुडिओच्या अनुपम जोशी यांनी ही खास डिझाइन्स तयार केली होती.यानंतर या १० स्पर्धक युवतींची बुद्धिमत्ता, हजरजबाबीपणासर्वसाधारण ज्ञानव्यक्तिमत्व आणि सौंदर्य याआधारे परिक्षकांनी प्रश्न विचारून त्यानंतर मिस पुणे फेस्टिवल व रनर अप यांची निवड करून घोषणा केली.परीक्षक म्हणून  मॉडेल विवेक पवार,डीवा पॅजंट कोच अंजना मस्करेनाझ, फॅशन फोटोग्राफर मोहन रानडे, आंतरराष्ट्रीय डिझायनर शलाका पंडित आणि टॉप मॉडेल यश राणा यांनी काम पहिले.

   या व्यतिरिक्त तज्ञांकडून या स्पर्धकांमधून बेस्ट स्माईल,बेस्ट हेअर,बेस्ट फिटनेस मॉडेल,मिस फेवरेट आणि मिस फोटोजेनिक निवडले गेले. प्रेक्षकांनी तुडुंब भरलेल्या या कार्यक्रमात रेधून अकादमीच्या कलावंतानी आकर्षक नृत्याविष्कार सादर केले. आशुतोष राठोड यांनी याचे नृत्य दिग्दर्शन केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे जुगल चंदन यांनी संगीत संयोजन केले.

  गेल्या वर्षात  या स्पर्धेतून पुढे जाऊन यशस्वी झालेल्या मॉडेल्स व अभिनेत्रींचा खास रॅम्प वॉक यावेळी सादर करण्यात आला .यासाठी  प्रथा या साडी ब्रँड चे प्रायोजकत्व लाभले होते.
    या स्पर्धेतील सर्व 20 स्पर्धकांना ज्वेलरी स्नेहा ब्रूच यांनी दिली असून सारा ज्वेलर्स यांनी चांदीचे खास डिझाइन केलेले मुकुट दिले. या कार्यक्रमासाठी धनकवडे ग्रुपचे सहप्रयोजकत्त्व लाभले असून डिवाईन लव इलेगन्स स्पासारा ज्वेलर्स सलोन अॅपलसंस्कृता अॅकॅडमी,  डेंटल वर्ल्ड यांच्याकडून विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. किशोर वायकर यांनी या सर्व कार्यक्रमाची व्हिडिओ व फोटोग्राफी केली. अश्विन कोडगुले यांनी या युवतींचे फोटोशूट केले. सर्व स्पर्धकांची हेअरस्टाईल व मेकअप संस्कृता ब्युटी अकादमी यांच्याकडून केली गेली. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे शहरातील गणेशोत्सव सर्व दिवस 24 तास खुला राहण्यासाठी आमदार हेमंत रासनेंकडून पाठपुरावा सुरु

पुणे (दि २०): राज्य सरकारकडून गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून...

विमानतळ परिसर स्वच्छ ठेवा, अन्यथा जागा ताब्यात घेऊ; आयुक्त नवल किशोर राम यांचा इशारा

पुणे-.लोहगाव विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला असून,...

महापालिकेत ब्लॅकमेलर्सचा वाढला उपद्रव…?

पुणे -महापालिकेत सामाजिक कार्याच्या नावाने येणाऱ्या काही हाताच्या बोटावर...

५ लाखांवरील होणाऱ्या कामांची त्रयस्त संस्थेमार्फत तपासणी का नाही? महापालिका आयुक्तांनीच विचारला सवाल

पुणे -महानपालिकेच्या विविध विभागांमार्फत विकसित होणाऱ्या विकास कामांची मे....