सुफी मैफलीत ‘ अल्ला हुँ ‘ ते ‘ तीर्थ विठ्ठल ‘ चा गान प्रवास (आवर्जून ऐका-पहा हा व्हिडीओ)
पुणे : ‘ सुफी संगीत ,कव्वाली ‘ कार्यक्रमात वातावरण मंत्रमुग्ध झाले आणि मैफिलीच्या माध्यमातून सर्व धर्म समभावाचा मेळ घातला गेला.. ! निमित्त होते ‘ पुणे फेस्टिव्हल ‘ मधील ‘ सुफी संगीत ,कव्वाली ‘ मैफलीचे !
सुफी गायक पवन श्रीकांत नाईक यांच्या या सुफी मैफलीत पुणेकरांनी ‘ अल्ला हुँ ‘ ते ‘ तीर्थ विठ्ठल ‘ चा गान प्रवास अनुभवला.
‘ पुणे फेस्टिव्हल ‘ अंतर्गत गणेश कला क्रिडा केंद्र येथे ही मैफल ‘अवामी महाज ‘, ‘ मुस्लीम को ऑपरेटिव्ह बँक ‘ आणि इनामदार हॉास्पिटल यांनी शुक्रवारी रात्री आयोजित केली होती.
याच कार्यक्रमात के. रहमान खान यांच्या हस्ते राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव सतीश त्रिपाठी, तसेच हाजी गुलाम महमद आझम एज्युकेशन ट्रस्ट चे माजी अध्यक्ष् मुनव्वर पीरभॉय यांना अनुक्रमे ‘ फक्र- ए – महाराष्ट्र ‘, आणि ‘फक्र – ए – पुणे ‘ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
माजी केंद्रीय मंत्री के. रहमान खान, माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी, मीरा कलमाडी,’अवामी महाज ‘ चे अध्यक्ष डॉ.पी. ए. इनामदार , आबेदा इनामदार, अशोक धिवरे, आमदार मोहन जोशी,एस.ए. इनामदार,लतीफ मगदूम,वाहिद बियाबानी, शाहीद शेख , संतसिंग मोखा,उपस्थित होते.समाजातील विविध मान्यवर, सर्वधर्मीय, सर्वपक्षीय कार्यकर्ते, संस्थांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवले.
यामध्ये पवन श्रीकांत नाईक (प्रमुख गायक), कल्याण मुरकुटे (हार्मोनियम व गायन), नरसिंग देसाई व पंकज नाईक (हार्मोनियम), स्मिता राणा (सतार), कुलदीप चव्हाण (बेंजो), हर्षद भावे (तबला, जेंबे), गोपीनाथ वर्पे (पखवाज), विश्वजीत कुलकर्णी (तबला) व कोरसला विजय जाधव, डॉ. रिझवान शेख, नवरत्न वर्मा, संकेत गांधी, अविनाश तिजोरे, हरीश कुटे, पवन तळेकर, उद्धव म्हस्के, भालचंद्र जाधव, राधिका परदेशी, मुलांशू परदेशी, श्रेयस क्षित्रे, हे राष्ट्रीय पातळीवरील कलावंत सहभागी झाले. एकूण 22 कलावंतांसह सादर झालेल्या या कार्यक्रमाचे निवेदन व सूत्रसंचालन वीणा दिघे यांनी केले.
जैन, शीख, ख्रिस्त , बौद्ध धर्मातील रचना सादर करण्यात आल्या. यामध्ये जैन धर्मातील णमोकार मंत्र, शीख धर्मातील गुरु ग्रंथ साहेब मधील नामदेव यांच्या रचना , ख्रिस्त धर्मातील रेव्हरंड टिळक यांच्या रचना, उपासना संगीतातील रचना सादर केली. एकात्मतेचा मेळ घालणारी रचना हे वैशिष्ट्य होते.
‘झुले झुले लाल’ ही नीराकार-साकार निर्गुण कलाकारी असलेली रचना होती. पवित्र प्रेमाच्या रचनामध्ये ‘कींना सोना तेनू’, ‘आजा तेनू अँखिया’, ‘छाप तिलक मोसी छीन’, ‘ख्वाजा मेरे ख्वाजा’ अशा रचनांचा समावेश होता.
या मैफिलीत हिंदी, मराठी, उर्दू, पंजाबी आणि संस्कृत अशा विविध भाषांमधून रचना सादर करण्यात आल्या.