पुणे :’ पुणे फेस्टिव्हल ‘ च्या ‘ ऑल इंडिया मुशायरा ‘ मध्ये सर्वधर्मसमभावाचे दर्शन पुणेकरांना घडले. महाराष्ट्र विधान परिषदेचे उपाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
‘ पुणे फेस्टिव्हल’ चे अध्यक्ष सुरेश कलमाडी, मुशायरा संयोजक डॉ.पी. ए. इनामदार, माजी मंत्री रमेश बागवे, अभय छाजेड, मुनवर पीरभॉय, अॅड. अयुब शेख, शाहिद शेख उपस्थित होते.
पूर परिस्थितीत डेहराडूनमध्ये मुस्लीम धार्मियांना ईदच्या दिवशी मशीद उपलब्ध नव्हती. तेव्हा नमाजासाठी गुरुद्वारा उपलब्ध करुन एकात्मतेचे , बंधू भावाचे दर्शन घडले होते. त्याची दखल घेऊन शीख बांधवांचा सन्मान ‘पुणे फेस्टिव्हल’ मधील ‘ऑल इंडिया मुशायरा’ कार्यक्रमात करण्यात आला. डॉ.पी. ए. इनामदार यांनी यासाठी पुढाकार घेतला.
कॅम्पमधील गुरुनानक दरबार गुरुद्वाराचे प्रमुख पी.एस.सैगल, संतसिंग मोखा,दलजित सिंग रांक आणि सहकाऱ्यांचा सन्मान माणिकराव ठाकरे यांनी केला.
गणेश कला क्रिडा मंच येथे
झालेल्या या कार्यक्रमात पॉप्युलर मेरठी, जोहर कानपूरी, इक्बाल अशहर, डॉ.कासिम इमाम, डॉ. मेहताब अलाम, कैसर खालिद, सुंदर मालेगावी, तजवर सुलताना, प्रीता बाजपेयी, मोनिका सिंग, सुफीयान काझी आणि आदी देशभरातून नामवंत
शायरांनी मैफल गाजवली.
’पुणे फेस्टिव्हल’ चे अध्यक्ष सुरेश कलमाडी, रमेश बागवे, अभय छाजेड, मुनवर पीरभॉय, डॉ. सतीश देसाई, सुरेश धर्मावत, शाहीद शेख उपस्थित होते.इक्बाल अन्सारी यांनी सूत्रसंचालन केले. वाहिद बियाबानी यांनी आभार मानले.

