पुणे- महापालिकेच्या उपमहापौरपदी डॉ. सिद्धार्थ धेंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आज झालेल्या या निवडणुकीतून काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून दाखल करण्यात आलेल्या लता राजगुरू यांचा अर्ज भरण्यात आला होता.

दरम्यान, आज झालेल्या निवडणुकीदरम्यान हा अर्ज मागे घेण्यात आल्याने डॉ. धेंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पुणे महापालिकेचे उपमहापौर नवनाथ कांबळे (वय 48 ) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने 16 मे रोजी निधन झाले होते. त्यानंतर हे पद रिक्त झाले होते.अनेकांनी यावेळी भाषणे करीत श्री धेंडे यांचे अभिनंदन केले.