पुणे- नेहमी सर्वात आघाडीवर असलेल्या पुणे शहर कॉंग्रेस ने यावेळी मात्र ,आज राष्ट्रवादी, शिवसेना यांच्यानंतर आपला निवडणूक कार्यक्रम म्हणजे उमेदवारी अर्ज वाटप आणि मुलाखतींचा कार्यक्रम जाहीर केला . हर्षवर्धन पाटील आणि विश्वजित कदम , आ शरद रणपिसे , आ. दीप्ती चौधरी , माजी मंत्री चंद्रकांत छाजेड तसेच अनंतराव गाडगीळ ,कमल व्यवहारे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी हा कार्यक्रम जाहीर केला .
२१ ते २५ डिसेंबर सकाळी १० ते ६ उमेदवारी अर्ज वाटप
अर्ज फी -५०० रुपये
पक्ष निधी –
खुला गट- १० हजार रुपये,
ओबीसी- साडेसात हजार रुपये
मागासवर्गीय -५ हजार रुपये
२७ ते ३० डिसेंबर –इच्छुकांच्या मुलाखती
पुणे महापालिकेसाठी कॉंग्रेसकडून उमेदवारी अर्ज वाटप ,मुलाखती चा कार्यक्रम जाहीर
Date:

