कुटील कारस्थानी राजकारणाचे डावपेच उधळून लावले
पुणे- संविधानाने दणका दिल्याने ‘अखेर झुठे का मुह काला’ झाला -हा लोकशाहीचा विजय आहे, भारतीय संविधानाचा विजय आहे अशी प्रतिक्रिया देत आज पुणे शहर कॉंग्रेस चे अध्यक्ष रमेश बागवे आणि कॉंग्रेसच्या नेते ,कार्यकर्त्यांनी फटाके फोडत ,लाडू,पेढे वाटत कॉंग्रेस भवनात आनंदोत्सव साजरा केला कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेलं संख्याबळ आपल्याकडे नसतानाही कुटील राजकारण करून सत्ता लाटण्यासाठी भाजपने रचलेले कुटील कारस्थानांचे मनसुबे हे न्यायालयाने जर आहे बहुमत तर ४८ तासात सिद्ध करा असे आदेश दिल्याने लबाड लांडगी उघडी पडली आणि याबाबत जाणीव झाल्यानंतर भाजपचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी आज बहुमत चाचणीआधीच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. या घडामोडीमुळे काँग्रेस जनांमध्ये चांगलाच उत्साह संचारला असून पुणे शहर काँग्रेसने या घटनेचे ढोल ताशांच्या गजरात सेलिब्रेशन केले.
येडीयुरप्पा यांच्या राजीनाम्याची कर्नाटकातील सत्तास्थापनेच्या नाटकावर अखेर पडदा पडलाय. त्यामुळे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे येडियुरप्पा अवघ्या अडीच दिवसांचे मुख्यमंत्री ठरले. या घटनेमुळे काँग्रेस आणि जेडीएस एकत्रित सत्तेचा दावा करण्यास पात्र ठरले आहेत. याचे जोरदार सेलिब्रेशन पुणे शहर काँग्रेसने केल्याचे शुक्रवारी बघायला मिळाले. यावेळी शहरातील ऐतिहासिक काँग्रेस भवनासमोर ढोल ताशा वाजवून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी शहर काँग्रेस अध्यक्ष व माजी मंत्री रमेश बागवे, माजी आमदार दीप्ती चवधरी, मोहन जोशी, नगरसेवक अविनाश बागवे,माजी उपमहापौर मुकारी अलगुडे यांनी ठेका धरला. कमल व्यवहारे,नीता रजपूत आदी महिला कार्यकर्त्यांनी फुगड्या घालून या घटनेचा आनंद व्यक्त केला. शहराध्यक्ष रमेश बागवे तसेच मोहन जोशी या वेळी काय म्हणाले … कॉंग्रेस भवनात कसा साजरा झाला आनंदोत्सव …पहा एक व्हिडीओ झलक …