पुणे- उडत आहेत कावळे..आणि झटत आहेत मावळे.. असे चित्र आता कॉंग्रेसच्या वर्तुळात दिसत आहे. देशभर भाजपने आपला झेंडा रोवला… आणि स्वातंत्र्य चळवळीतील कॉंग्रेस पक्षाला मोठा हादरा दिला .. काँग्रेसच्या जहाजाला बसलेले हे हादरे प्रचंड मोठे होते… अशा दारुण स्थितीत , जिकडे सत्ता तिकडे अनेक जण धावले ..आणि हळू हळू कॉंग्रेस मध्ये केवळ निष्ठावंतच उरत आहेत अशी स्थिती निर्माण होवू पहाते आहे . या निष्ठावंतांनी आता जरी त्यांची संख्या कमी असली तरीही
फौलादी है अपनी बाहे ..फौलादी है राहे …
या उक्तीप्रमाणे झटून काम करायला सुरुवात केली आहे . पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवरील घसरणुकीनंतर आता पुण्यात कॉंग्रेसच्या सभासद नोंदणीचे काम हाथी घेण्यात आले आहे . यश अपयशाची चिंता न करता हाथ मजबूत करण्यासाठी काही हाथ झटू लागले आहेत .. त्याचा पहा हा एक अल्पसा रिपोर्ट …
फौलादी है अपनी बाहे ..फौलादी है राहे …. कॉंग्रेसची सभासद नोंदणी सुरु
Date:

