पुणे :
स्वारगेट एस.टी. आगारातील वाहक कर्मचारी सौ. अनिता संकपाळ यांची महाराष्ट्र एस.टी. वर्क्स कॉंग्रेस (इंटक) संघटनेच्या पुणे विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. इंटकचे अध्यक्ष आमदार जयप्रकाश छाजेड यांनी नियुक्तीचे पत्र. सौ. अनिता संकपाळ यांना दिले.
एस.टी. कामगारांचे दैनंदिन प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी, कामगार कायद्यानुसार फायदे, हक्क, सवलती मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे यावेळी सौ. अनिता संकपाळ यांनी सांगितले.


