Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

11 ते 4 तणावाखाली -पुणे बंद यशस्वी (व्हिडीओ रिपोर्ट)

Date:

पुणे : भीमा कोरेगाव घटना आणि त्यानंतर भारिप बहुजन महासंघासह अन्य संघटनांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेच्या पार्श्वभूमीवर आज पुणे परिसरातील विविध ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी मोर्चे काढत रास्तारोको केला. पुण्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरात काही भागात तुरळक तोडफोडीच्या घटना वगळता बंद  शांततेत पार पडला.सकाळी 11 ते 4 या वेळेत काही भागात  तणावपूर्ण शांतता होती .सायंकाळी 5 नंतर बंद  चा तणाव पूर्णपणे निवळला होता . आणि जनजीवन सुरळीत झाले .
दरम्यान तणावाच्या अनेक ठिकाणी पोलिसांनी संयमी भूमिका घेतली .आणि बडे नेते कोणी रस्त्यावर उतरल्याचे  दिसले नाहीत .सुदैवाने बंद तणावाखाली असूनही  गालबोट लागले नाही .
ज्या ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात आले, त्या दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे, असे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सांगितले. ”पुणे शहरातील परिस्थिती शांततापूर्ण आहे. . शहरातील विविध ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये”, असे आवाहन पुण्याच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी केले.
कोरेगाव भिमा येथील झालेल्या  घटनेनंतर राज्यात विविध ठिकाणी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे राज्यातील काही ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. पुण्यातही खबरदारी म्हणून कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याबाबत शुक्ला यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले.
शहरात दिवसभरात १८ बसगाड्या वर दगडफेक, एकूण ७० छोटे-मोठे मोर्चे निघाले. तर भीमा कोरेगावच्या घटनेस कारणीभूत असणाऱ्या मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भारिपचे प्रकाश आंबेडकर यांनी काल केली होती. या प्रकरणी एकबोटे व भिडे यांच्यावर येरवड्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजीनगर भागातील मिलिंद एकबोटे यांच्या घराभोवती पोलिसांनी बंदोबस्त तैनात केलेला होता .
भारिप बहुजन महासंघातर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्यास विविध संघटनांनी पाठिंबा देत भीमा कोरेगाव येथील घटनेचा निषेध नोंदवला. काही घटना वगळता शहरात शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले.  पीएमपीच्या सरासरी ५० ते ५५ बसेसचे नुकसान झाल्याचे समजते. रेल्वे रोको करण्याचा प्रयत्न झाला, २१ ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला.
दांडेकर पूल, अपर इंदिरानगर, पिंपरी, ताडीवाला रोड, चंदननगर येथील परिसर संवेदनशील असल्याने बंदोबस्तही वाढवण्यात आला होता. स्वत: शुक्ला यांनी सकाळी शहरात फिरून बंदोबस्ताची पाहणी केली. अतिसंवेदनशील भाग म्हणून ओळख असलेल्या अप्पर-इंदिरानगर भागातील बंद तणावपूर्ण शांततेत पार पडला. काही किरकोळ घटना वगळता या बंदला कोठेही गालबोट लागले नाही.
बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अप्पर येथील डॉल्फिन चौक, महेश सोसायटी चौक सकाळी १० च्या सुमारास आंदोलकांनी बंद केला. त्यामुळे या भागात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली होती. एक-दोन बस वर काही आंदोलकांनी दगड मारले. त्यानंतर बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर यांनी सर्व बस अप्परकडे येणे थांबविले.
कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ आयोजित महाराष्ट्र बंदला हडपसर येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध आंबेडकरवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी हडपसर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला व ठिय्या आंदोलन केले. आंदोलकांनी मिलिंद एकबोटे व भिडे गुरूजी यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. तसेच सरकारचा जाहिर निषेध केला. या घटनेची चौकशी करून आंदोलन घडवून आणलेल्या दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. सहाय्यक पोलिस आयुक्त मिलिंद पाटील व विष्णू पवार यांनी निवेदन स्वीकारले.
दरम्यान सोलापूर रस्त्यावर दोन पीएमपी बसेसवर दगडफेक तसेच भेकराईनगर येथील एका दुकानावर दगडफेक झाल्याच्या किरकोळ घटना वगळता बंद शांतते पार पडला. पोलिस तत्काळ पोहचल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.
खासगी शाळा, महाविद्यालयां सोबतच खासगी प्रवासी वाहतूक धारक बंदमध्ये सहभागी झाले होते. त्याचबरोबर रामटेकडी चौकात देखील रामटेकडी येथील आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी रस्ता रोको केले व मोर्चा काढून या घटनेचा निषेध केला. मुख्य बाजारपेठ कडकडीत बंद होती. दरम्यान, वानवडी पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चौका-चौकात चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून विनम्र अभिवादन

“समानता, न्याय आणि संवैधानिक मूल्यांची जपणूक हीच बाबासाहेबांना खरी...

पुण्यात ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची घोषणा

बीसीसीआय स्टॅंडर्डसह देशातील सर्वात मोठा प्रायव्हेट क्रिकेट सेटअप सुरू पुणे...

नगर अभियंता पदावर ..अनिरुद्ध पावसकर !

पुणे महापालिकेतील नगर अभियंता पदावर पथ विभागाचे प्रमुख अभियंता...

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...