पुणे -विमानतळावर एक विमान आज आज संध्याकाळी ६:५० वाजता धावपट्टीवरून घसरलं. एअर इंडियाचं हे विमान असल्याचं सांगण्यात येते आहे . . हे विमान दिल्ली ते पुणे प्रवास करत होतं. AI -८४९ या क्रमांकाच्या या विमानामधून १५२ प्रवासी प्रवास करत होते आणि हे सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती आहे. हे
कुठलंही विमान उतरल्यावर धावपट्टीच्या एका विशिष्ट भागावर उतरवलं जाते , आजचं हे विमान या खुणेच्या ठिकाणी थांबलं नाही. यावेळी पायलटने ब्रेक लावल्याने विमान ‘स्किड’ झालं त्यामुळे ते घसरत पुढे जात विमानाचं पुढचं चाक रन वे च्या उजव्या भागाच्या बाहेर जात थांबलं.
यानंतर पुणे विमानतळावरच्या आपत्कालीन यंत्रणा कामाला लागल्या. विमानात बसलेल्या सर्व १५२ प्रवाशांची सुरक्षितता गरजेची असल्याने त्यांना बाहेर काढणं ही प्राथमिकता होती त्यानुसार ‘शूट’ साहाय्याने त्या सर्व प्रवाशांना विमानांच्या बाहेर काढण्यात आलं. सर्व प्रवासीी सुरक्षित आहेत.

