पुणे -श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सकाळचे बातमीदार गजेंद्र बडे यांची निवड झाली असून उपाध्यक्षपदी लोकमतचे सुनील राऊत आणि पुढारीचे सुनील जगताप यांची निवड करण्यात आली.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सरचिटणीसपदी इंडिया टीव्हीचे अजय कांबळे, खजिनदारपदी महाराष्ट्र टाईम्सच्या चैत्राली चांदोरकर, चिटणीसपदी मिड डेच्या चैत्राली देशमुख आणि दिव्य मराठीचे मंगेश फल्ले यांची निवड करण्यात आली आहे. या सर्व पदाधिका-यांची निवड 2016-17 या वर्षा करता करण्यात आली आहे.
कार्यकारिणीच्या सदस्यपदी निवड झालेल्या सदयस्यांची नावे पुढील प्रमाणे –विजय चव्हाण (केसरी), संजय कडू (प्रभात), सागर येवले (प्रभात), कपिल पवार (पुढारी), योगेश बोरसे (मी मराठी), लक्ष्मण मोरे (लोकमत), धनाजी कांबळे (लोकमत), किशोर बरकाले (पुढारी), दीप्ती नितनवरे (पुण्यनगरी) आणि विकी कांबळे (झी 24 तास) यांची निवड झाली आहे. पार पडलेल्या या निवडणुकीचे निर्णय अधिकारी म्हणून अॅड. प्रताप परदेशी आणि अॅड. सुभाष किवडे यांनी काम पाहिले.

