पुणे- धनकवडीतील के के मार्केट मधील मिळकतकराच्या थकबाकीदारांकडून कर वसुलीसाठी महापालिकेने आज जप्तीच्या कार्यवाहीला प्रारंभ केला आणि तेथील मिळकत धारकांमध्ये खळबळ उडाली .यावेळी अनेकांनी कुलुपे ठोकत तिथून दूर राहणे पसंत केले . या इमारतीत काहींनी ऑफिसेस भाड्याने दिली आहेत . या भाडेकरूंना काय करावे सुचेना.. अगोदर वाद करत ,नंतर समजून घेत काही मालकांनी तातडीने कराची थकबाकी भरण्यास प्रारंभ केला .तर काही भाडेकरूंनी अगोदर वाद घालत नंतर मालकांकडून धनादेश मिळवून पालिकेच्या पथकाकडे सुपूर्त केले . तर काहींची मिळकत सील झाल्यावर काहींनी धनादेश आणून जमा केले .
मिळकत कराची थकबाकी अशा पद्धतीने जागेवर जावून जप्तीची कार्यवाही करीत वसूल करणे हे मोठे जिकीरीचे काम सध्या महापालिकेचे पथक करते आहे . अलीकडेचबालेवाडी येथील हॉटेल आर्चिड वर झालेली कारवाई त्यानंतर हॉटेल मालकाकडून मिळालेले 2 कोटी रुपये , त्यानंतर पुण्यातील येथे आज दुसऱ्या बड्या बांधकाम व्यावसायिकावर इथे कारवाईची प्रयत्न झाल्यावर पालिकेकडे धनादेश जमा झाल्याचे पालिकेच्या या अधिकाऱ्यांनी सांगितले.
या कारवाईच्या पथकात महापालिकेच्या मिळकत कर विभागाचे गिरीश पत्की, विलास जगताप,प्रकाश वालगुडे, शांताराम बागवे ,गणेश धावडे, आदी अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते .
मिळकत कर वसुलीच्या या पथकाबरोबर काढलेल्या काही अवधीतील अवघ्या ४ मिनिटांची झलक दाखविणारा हा व्हिडिओ नक्कीच साऱ्यांचीच व्यथा आणि कथा सांगेल …