गुजरात राज्य सरकार आणि वेदांता-फॉक्सकॉन ग्रुप यांच्यामध्ये सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले फॅब उत्पादनासाठी 1.54 लाख कोटी रुपयांच्या झालेल्या सामंजस्य कराराबद्द्ल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली प्रतिक्रिया
गुजरात राज्य सरकार आणि वेदांता-फॉक्सकॉन ग्रुप यांच्यामध्ये सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले फॅब उत्पादनासाठी 1.54 लाख कोटी रुपयांच्या झालेल्या सामंजस्य कराराबद्द्ल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ही गुंतवणूक अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी महत्त्वाची ठरेल आणि त्याचबरोबर निर्माण होणाऱ्या रोजगारामुळे इतर पूरक उद्योगांना आणि त्या अनुषंगाने सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठीही साहाय्यकारी होईल, असेही पंतप्रधानांनी नमूद केले आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचा ट्विटर संदेश शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे,
“हा सामंजस्य करार म्हणजे भारतातील सेमीकंटक्टर उत्पादन क्षेत्राच्या महत्त्वाकांक्षांना गती देण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल आहे. ही 1.54 लाख कोटींची गुंतवणूक अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या आणि रोजगार निर्मितीच्या दृष्टीने महत्वाची आहे. यामुळे इतर पूरक उद्योगांसाठी मोठी परिसंस्था निर्माण करेल आणि सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी साहाय्यकारी ठरेल.”