मुंबई. स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकर यांच्या विरोधात कॉंग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे निवेदन आणि या अपमाना विरोधात भाजपने आज मुंबईत जोरदार निदर्शने केली. भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि मुंबईतील दादर येथील महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे मुख्यालय असलेल्या टिळक भवनाच्या बाहेर निषेध केला. भारतीय जनता युवा मोर्चाने आयोजित केलेल्या या आक्रमक निदर्शनात मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कामगार स्टेडियमबाहेर कॉंग्रेस विरोधात भाजपचे कार्यकर्ते, मुंबई अध्यक्ष आमदार लोढा यांच्या नेतृत्वात, ‘वीर सावरकरांच्या सन्मानार्थ भाजप मैदानात’, ‘होश मे आवो होश मे आवो’, ‘कॉंग्रेस पार्टी होश मे आवो’, शर्म करो शर्म करो कॉंग्रेस पार्टी शर्म करो’, ‘माफी मांगो, माफी मांगो, कॉंग्रेस पार्टी माफी मांगो’. ‘हिंदुस्थान सावरकरजींचा अपमान सहन करणार नाही’ कॉंग्रेसच्या शिदोरी या पत्रिकेचे दुकान बंद करा अश्या घोषणा देत या पत्रिका जाळण्यात आल्या असताना पोलिसांनी भाजपा कार्यकर्त्यांना अटक केली. मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी लोढा यांची नियुक्ती झाल्यानंतर पहिल्याच दिवशी अध्यक्ष लोढा यांनी कॉंग्रेस विरूद्ध जोरदार निदर्शने करून आपली संघटनात्मक ताकद दाखविली.
सावरकरांच्या अपमाना विरोधात मुंबईत भाजपाची निदर्शने
Date:

