आघाडीची गृहवित्त कंपनी असलेल्या आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेडने परवडणाऱ्या दरातील गृहवित्त आणि शाश्वत राहणीमानाच्या दिशेने कुटुंब या खास उपक्रमाद्वारे पाऊल टाकले आहे. या द्वारे परवडणाऱ्या घरांच्या क्षेत्रात हरित इमारतींना चालना दिली जाते. या योजनेला उद्योगातील तज्ज्ञ आणि रिअल इस्टेट विकासकांच्या भागीदारीत सुरुवात केली असून त्यातून ते हरित इमारतींसाठी साधनसुविधा आणि ज्ञानाधारित मॉडेलचा विकास करत आहेत.
नॅशनल हाऊसिंग बँक (एनएचबी), इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन (आयएफसी), ग्रीन बिझनेस सर्टिफिकेशन आयएनसी (जीबीसीएल), सीडीसी ग्रुप यूके आणि अशोक बी लाल आर्किटेक्ट्स यांनी या खास उपक्रमाचा भाग होण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सर्वोच्च राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडून या उपक्रमाला सहकार्य आणि गौरव प्राप्त होत आहे.