रिदम वाघोलीकर , रचना खडीकर -शहा यांना ‘ वॉव ‘ अॅवार्ड
पुणे :
भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर ‘ स्वरलता ‘ हे कॉफी टेबल बुक लिहिणारे पुण्यातील युवा लेखक रिदम वाघोलीकर आणि अतिथी संपादक रचना खडीकर -शहा यांना ‘ वॉव ‘ पारितोषिक मिळाले आहे.
ब्लीस इक्विटी पब्लिकेशन्स् तर्फे मुंबईत आयोजित समारंभात अभिनेत्री स्मिता जयकर यांच्या हस्ते हे पारितोषिक देण्यात आले. हा कार्यक्रम ९ डिसेंबर रोजी झाला.
ग्रामोफोन डिस्क च्या अनोख्या आकारात प्रसिध्द झालेल्या ‘स्वरलता ‘ या कॉफी टेबल बुक मध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांनी लतादीदींबद्दल लिहिले आहे. दिलीपकुमार, हरिप्रसाद चौरासिया, पंडित जसराज, बिरजूमहाराज, बाबासाहेब पुरंदरे, माधुरी दीक्षित, नितीन गडकरी, राज ठाकरे, मीना खडीकर, जब्बार पटेल, सुदेश भोसले, रेखा अशा ३८ दिग्गजांनी लेखन योगदान दिले आहे. लता दीदींच्या वाढदिवसाची भेट असलेल्या या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन त्यांच्याच हस्ते झाले होते.या अनोख्या प्रकाशन प्रकल्पाची दखल घेऊन ‘ वॉव ‘ पारितोषिक देण्यात आले आहे .
रचना खडीकर -शहा या लतादीदींच्या भाची असून व्यवसायाने मोटीव्हेशनल स्पिकर आहेत.
रिदम वाघोलीकर आणि रचना खडीकर -शहा यांनी गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्यावर लिखाणाचा संकल्प केला असून फेब्रुवारी २०१८ मध्ये ते प्रकाशित होईल.