पुण्यात प्रथमच ‘ख्रिसमस कार्नीव्हल’ चे आयोजन
पुणे :
‘मेथडिस्ट मराठी चर्च’च्या वतीने पुण्यात प्रथमच ‘ख्रिसमस कार्नीव्हल’ चे आयोजन करण्यात येत आहे.
ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर हा कार्नीव्हल दिनांक 8,9 आणि 10 डिसेंबर दरम्यान गोळीबार मैदान, शंकरशेठ रोड, पुणे येथे सकाळी 11 ते रात्री 10 या वेळात होणार आहे. ‘जगातील शांतता’ ही कार्नीवलची थीम असून,
ख्रिसमस एकत्रीत उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यासाठी ह्या कार्नीव्हलमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कार्नीव्हलचे प्रमुख आयोजक रेव्हरंड चंद्रशेखर जाधव आणि ‘मेथडिस्ट मराठी चर्च’ चे सचिव अॅड. मार्कस देशमुख यांनी आज श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
हा कार्नीव्हल सर्वांसाठी खुला आहे. या कार्नीव्हलमध्ये पुण्यातील विविध संस्था सहभागी होणार आहेत. यामध्ये
’हचिंग्स हायस्कूल’,’सेंट हेलेना स्कूल’,आंतरराष्ट्रीय स्तरातील प्रार्थना स्थळातील गायक वादक मंडळी
ख्रिसमस कॅरोल्स सादर करतील. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत श्री. रॉय हे व्हॉयलीन आणि श्री. टेरेंन्स नृत्य सादर करणार आहेत.
कार्नीव्हलमध्ये सौंदर्य स्पर्धा आणि ‘लेसर शो’ हे विशेष आकर्षण असणार आहे. योग, फिटनेस, एरोबिक्स, झुम्बाच्या कार्यशाळा तसेच विविध खेळ, फूड स्टॉल असणार आहेत, अशी माहिती अॅड.मार्कस देशमुख यांनी दिली.