‘मोबाईल डीस्पेन्सरी’ ने दिली आज ३४१ गरजू रुग्णांना उपचार सेवा

Date:

पुणे :
कोरोना लॉक डाऊन काळात पुण्यातील गरजुंना मोफत आणि फिरती वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी भारतीय जैन संघटना आणि आझम कॅम्पस मधील झेड.व्ही.एम.युनानी मेडिकल कॉलेजकडून मदतीसाठी ५ रुग्णवाहिकांचे सुसज्ज पथक कार्यान्वित करण्यात आले आहे.या मोबाईल डीस्पेन्सरी द्वारे बुधवारी कसबा पेठ,मोमिनपुरा,तोफखाना,कागदीपुरा,राजीव गांधी नगर परिसरात  ३४१ गरजू रुग्णांना उपचार सेवा देण्यात आली. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
 या वैद्यकीय पथकात २५ डॉक्टर्स आणि ५ सुसज्ज रुग्णवाहिका आहेत.१५ एप्रिल पासून या पथकाने कामास सुरुवात केली आहे.आझम कॅम्पस (पुणे कॅम्प)येथे असलेल्या युनानी महाविद्यालयात या पथकाला कामाच्या सूचना देण्यात आल्या.  डॉ.ए.एच. फारुखी,डॉ.गजाला मुल्ला,डॉ.फौझिया फारुखी,डॉ.मंझूर अहमद,डॉ.शाहीन खान,नफीस शेख, यांनीआज देखील  रुग्णांची तपासणी करून उपचार केले.या सर्व ठिकाणी डॉक्टरांना पोलिसांची मदत मिळत आहे.
या सर्व पथकाचे नेतृत्व डॉ.मुश्ताक मुकादम यांच्याकडे आहे.युनानी महाविद्यालयाच्या आणखी आजी,माजी पदव्युत्तर विद्यार्थ्यानी या कोरोना विरोधी मोहिमेत सहभागी व्हावे,असे आवाहन डॉ.पी.ए.इनामदार यांनी केले आहे.शासकीय यंत्रणेशी समन्वय करून हे पथक सर्व आपत्कालीन वैद्यकीय सेवा,तपासण्या,उपचारांसाठी कार्यरत आहे,असे त्यांनी सांगितले.
आतापर्यत येरवडा,भीमनगर,कोंढवा,शिवनेरीनगर आणि मध्यवर्ती पेठांमध्ये या पथकाने वैद्यकीय सेवा दिली.शांतीलाल मुथा यांच्या मार्गदर्शनखाली भारतीय जैन संघटना आणि  झेड.व्ही.एम.युनानी मेडिकल कॉलेजचा हा संयुक्त प्रकल्प आहे. या आपत्कालीन वैद्यकीय सेवांसाठी डॉ.मुश्ताक मुकादम यांच्याशी 9922404536 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...

पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मदचे तीन सदस्य काश्मीर मध्ये ठार मारले..

दहशतवादी एका टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या मातीच्या घरात लपलेले आढळले...

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...