पुणे,
पुण्यातील युवकांच्या ‘श्री सालासर हनुमानचालिसा मंडळ’ आयोजित
गो -अन्नकोट उपक्रमात
१८ गोशाळा, ११ दिव्यांग -नेत्रहीन व्यक्ती आणि दिव्यांग-दृष्टीहीनासाठी कार्यरत १० संस्थांना मदत
करण्यात आली.स्वयंरोजगाराच्या चालना देणाऱ्या वस्तूही भेट देण्यात आल्या
हा उपक्रमशनिवारी सायंकाळी
रेणुका स्वरूप प्रशाला (मुलींची) सदाशिव पेठ येथे प्रा. मनिष मुंदडा (साई बालाजी एजुकेशन सोसायटीचे संचालक) , पुनमचंद्र धूत (महेश सहकारी बँकेचे संचालक)
, झुंबरलाल सारडा, जुगलकिशोर पुंगलिया, प्रतिक्षा बि
हाणी,
विष्णुकुमार चमाडीया, नरेश जालान यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
.
या कार्यक्रमादरम्यान बाळासाहेब परदेशी यांचा भजन संध्या कार्यक्रम झाला.
धीरज मुंदडा
आणिसचिन जाजू
यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
प्रशांत मुंदडा यांनी सूत्रसंचालन केले . मंडळाचे धीरज मुंदडा ,सचिन जाजू ,निलेश सारडा ,अमित राठी,निलेश जाजू यांनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले . मनीष मुंदडा यांनी युवकांच्या सामाजिक भावनेचे कौतुक केले . ते म्हणाले ,’ प्रत्यक्ष सहभागी झाल्यावर या उपक्रमाची महती कळाली . सामाजिक भावनेचे दिवे प्रत्येकाच्या हृदयात प्रज्वलित करणारा असा हा उपक्रम आहे . ‘श्री. सालासर हनुमानचालिसा मंडळ , गेल्या १० वर्षापासून महाशिवरात्रि ते हनुमानजयंती पर्यंत ४७ दिवस दररोज संगीतमय हनुमानचालीसाचे पाठ करत आले आहे.वेगवेगळ्या हनुमान मंदिरात झालेल्याया पठणाच्या आरती दरम्यान अर्पण झालेल्या पैशातून अनेक सामाजिक उपक्रम मंडळाकडून आयोजित केले जातात. आज झालेल्यागो अन्नकोट उपक्रमात
१८ गोशाळाना
९हजार किलो धान्य देण्यात आले. ११ दिव्यांग -नेत्रहीन व्यक्ती आणि १० सामाजिक संस्थांना वस्तुरुपी मदत
करण्यात आली.स्वयंरोजगारासाठी उपयुक्त साहित्य देण्यात आले . एरवी अन्न कोट उपक्रमात माणसांना आवडीच्या पदार्थाचा प्रसाद देवांना दाखवला जातो. या गो -अन्न कोट उपक्रमात मात्र गायींसाठी अन्न मिळावे याची काळजी घेतली जाते.
दिव्यांग-दृष्टीहीनाना , संस्थांना दैनंदिन जीवनातील विविध वस्तू देण्यात आल्या. त्यात पिठाची चक्की, फ्रीज, मिक्सर, कुकर, पंखे, शिलाई मशीन, स्कॅनर,वाद्ये, किराणा सामान, कपाटे, गाद्या अशा अनेक गोष्टींचा समावेश होता.
मंडळाचे यंदाचे ११ वे वर्ष आहे.
आधी भक्तांच्या घरी हा उपक्रम होत असे पण गेल्या २-३ वर्षांपासून जास्तीत जास्त लोकांनी यात सहभाग घ्यावा या हेतुन पुणे व पुण्याजवळील वि
विधमंदिरामध्ये , सोसायटीमध्ये,
वृद्धाश्रमातहा उपक्रम राबवण्यास सुरवात करण्यात आली.
यंदाच्या वर्षी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर,
महालक्ष्मीमंदिर सारसबाग,
नारायणी धाम लोणावळा,
भिकरदास मारुती मंदिर, संगमनेर, अश्या विविध मंदिरांचा देखील समावेश आहे.
मंडळाच्याउपक्रमाबाबत
अधिक माहिती :
दररोज रात्रि ९.३० वाजता चालीसा पाठाची सुरवात होते. ११ वेळेस विविध
चालींमध्येसंगीतमय हनुमान चालिसाचा पाठ,त्यानंतर आरती व मंत्रपुष्पंजलि असा दररोजचा नित्य क्रम असतो.
दररोज आरती मध्ये जमा झालेल्या राशिचा उपयोग पूर्णावती च्या होम साठी केला जातो व उर्वरित रक्कम समाजाच्या विधायक कामांसाठी केला जाते.मंडळाद्वारे अनेक सामाजिक कार्य केले जातात ज्यामध्ये निराधार कुटुंबास मदत,
पंढरपुरच्या वारीत
पालखीच्यावेळी
वारकऱ्यांची सेवा, युवा वर्गातील मुलांसाठी
प्रेरक व्याख्याने,
अंधशाळा,
अनाथालय व
वृद्धाश्रमयांना वस्तुरूप
तसेचआर्थिक मदत अश्या अनेक गोष्टींचा समावेश होतो.
या वर्षी दुष्काळग्रस्त
भागातीलगायीदत्तक घेण्याचा मंडळाचा मानस आहे.
त्याचप्रमाणे
आवश्यक रक्ताचा तुटवडा लक्षात घेत एप्रिल
महिन्यातमुरलीधार मंदिर,खड़क माळ येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
करण्यात आलेआहे
,अशी माहित
धीरज मुंदडा यानी दिली.
या ४७ दिवसांच्या उपक्रमामध्ये
लहानांपासून मोठयांपर्यंत सर्वांचाच उत्स्फूर्त प्रतिसाद असतो.
या उपक्रमाची सांगता हनुमान
जयंतीच्या दिवशी भव्य होम-हवानाने केली जाते.
समाजातील विविध स्तरातील प्रतिष्ठित व्यक्ति देखील या ४७
दिवसांच्या उपक्रमात आवर्जून सहभागी होतात.
हनुमानचालीसाचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा हाच मंडळाचा हेतु आहे.
जास्तीत जास्त लोकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे अशी विनंती सचिन जाजू यांनी केली आहे.