पुणे:
हेल्पो फौंडेशन तर्फे ग्रामीण शेतकरी महिलांसाठी फूड प्रोसेसिंग प्रशिक्षण वर्ग झेंडेवाडी (सासवड ) येथे आयोजित करण्यात आला होता .नाबार्ड आणि बँक ऑफ महाराष्ट्र च्या सहकार्याने आयोजित या प्रशिक्षण वर्गात प्रा. रईसा शेख यांनी ‘स्मार्ट फार्मिंग ‘,शीत साखळी (‘कोल्ड चेन),विपणन याविषयी मार्गदर्शन केले. प्रा.उझ्मा सरखोत यांनी करप्रणाली आणि जीएसटी बाबत मार्गदर्शन केले. हेल्पो फौंडेशनच्या शमीम शेख,संतोष कामठे,विठ्ठल झेंडे उपस्थित होते. या ग्रामीण शेतकरी महिलांनी मिळून प्रक्रिया केलेल्या सेंद्रिय कृषी उत्पादनांच्या विपणनासाठी ‘लक्ष्मी प्रोडुसर कंपनी ‘ स्थापन केली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

