पुणे :
‘नवबौद्ध ६ डिसेंबर ला मुंबईला फुकट येतात’ हा सोशल मीडिया पोस्ट द्वारे अभिनेत्री केतकी चितळे यांचा अपप्रचार असून दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे . आंबेडकर जयंती ,महापरिनिर्वाणदिन अशा सर्व प्रसंगी रेल्वेचे उत्पन्न वाढल्याची आकडेवारी त्यांनी माहितीच्या अधिकारात मिळवावी ,असे आव्हान ऑल इंडिया पँथर सेना विद्यार्थी आघाडीच्या अध्यक्षा उत्कर्षा शेळके यांनी केतकी चितळे यांना दिले आहे .
सवंग प्रसिद्धी मिळविण्यासाठी अशी विधाने करण्यापेक्षा केतकी चितळे यांनी अभिनयावर लक्ष केंद्रित करावे ,असा सल्लाही उत्कर्षा शेळके यांनी दिला आहे . आज पुण्यात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात शेळके यांनी केतकी चितळे यांच्या हेतूबद्दल शंका व्यक्त करून टीका केली आहे .

