![त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव चंद्रोदयाच्या साक्षीने उजळले दीप !](https://mymarathi.net/wp-content/uploads/2017/11/P_20171103_180703.jpg)
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव चंद्रोदयाच्या साक्षीने उजळले दीप !
पुणे :’नवचैतन्य हास्ययोग परिवार ‘ तर्फे *त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त शुक्रवारी चतुश्रुंगी मंदिरात ५ हजारहुन अधिक पणत्यांचा दीपोत्सव* आयोजित करण्यात आला होता ! चंद्रोदयाच्या साक्षीने हजारो पणत्या उजळल्याचे दुर्मिळ दृश्य पाहायला मिळाले
शुक्रवार दि. ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता हा दीपोत्सव झाला.. या उपक्रमाचे हे चवथे वर्ष हाेते. नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे अध्यक्ष विठ्ठल काटे यांनी प्रास्ताविक केले
*विजयराव भोसले यांनी केलेले दीपोत्सवासाठी भव्य आकाराचे रेखांकन व प्रसिद्ध रांगोळी कलाकार रामदास चौंडे यांची रांगोळी* हेही या दीपोत्सवाचे आकर्षण होते
कार्यक्रमासाठी *श्रीमती प्रतिभाताई शाहू मोडक, डॉ. सतीश देसाई, डॉ. मिलिंद भोई हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.* मकरंद टिल्लू यांनी सूत्रसंचालन केले. सुहास अनगळ यांनी आभार मानले.
चतुश्रुंगी देवी दर्शन आणि देवी समोर पणती लावण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली. प्रारंभी हास्ययोग परिवार सदस्यानी हास्य दीपही प्रज्वलित केले ! हास्य प्रकार सादर केले