12 नोव्हेंबरला ‘चला हवा येऊ द्या’ ची लंडनवारी

Date:

पुणे  :

युनायटेड किंगडम (यु के) मधील मराठी रसिकांसाठी भारतीय आणि खासकरून मराठी मनोरंजन विश्वातील विविध प्रयोग करण्यासाठी ‘बाराखडी एंटरटेनमेंटस्’ ने पुढाकार घेतला असून, रविवार दि. 12 नोव्हेंबर रोजी ’चला हवा येऊ द्या’ टीम लंडनमध्ये खास शो करणार आहे.

लंडनमधील ‘बाराखडी एंटरटेनमेंटस्’चे संचालक अमोघ धामणकर, गंधार बाबरे यांनी ही माहिती दिली.

लंडनमध्ये ‘ट्रॉक्सी थिएटर’मध्ये हा खास शो होत असून, ‘झी मराठी’ ची गाजलेली टीम तिथे शो साठी जात आहे.

अमोघ धामणकर आणि गंधार बाबरे या चित्रपटवेड्या दोन अभियंता मराठी तरुणांनी मनोरंजन विश्वातील चांगले प्रयोग, उपक्रम युनायटेड किंगडम वासियांना दाखवायच्या उद्देशाने ‘बाराखडी एंटरटेनमेंटस्’ची स्थापना केली. 2016 मध्ये ‘एक अलबेला’ हा मराठी सिनेमा त्यांनी इंग्लंडमधील 25 ठिकाणी प्रदर्शित केला आाणि त्याचे 75 शो झाले. ‘ब्रिटिश फिल्म सर्टीफिकेशन बोर्ड’कडून प्रमाणित होऊन प्रदर्शित होणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला! अशा तर्‍हेने ब्रिटिश टेरीटरी मराठी सिनेमाला ‘बाराखडी’च्या माध्यमातून खुली झाली.

नोव्हेंबर 2016 मध्ये त्यांनी ‘लई बाराचे’ हा कार्यक्रम 4 ठिकाणी केला. त्यात कुशल बद्रीके, भाऊ कदम, मंगेश देसाई, संतोष जुवेकर, विजू माने यांचा समावेश होता. ‘स्ट्रगलर साला’ या कॉमेडी शो च्या चित्रीकरणात त्यांनी लंडनमध्ये मदत केली.

या पार्श्वभूमीवर ‘चला हवा येऊ द्या’ चा खास प्रयोग 12 नोव्हेंबरला ‘ट्रॉक्सी थिएटर’मध्ये होत आहे. ‘चला हवा येऊ द्या’चे डॉ. नीलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रीके, श्रेया बुगडे, सागर कारंडे, भारत गणेशपुरे हे कलावंत लंडनमधील शो मध्ये सहभागी होणार आहेत. ’ट्रॉक्सी’ हे प्रख्यात थिएटर असून, तेथे यापूर्वी डॅनी बॉयल (स्लम डॉग मिलेनियर), रिचर्ड ब्रॅनसन (व्हर्जिन ग्रुप) अशा दिग्गजांनी शो केले आहेत.

‘चला हवा येऊ द्या ‘ च्या लंडन शो साठी ‘झी मराठी’, ‘वीणा वर्ल्ड’, ‘रॅपचिक’, रोटीमॅटीक, नक्षी डॉट कॉम यांचे सहकार्य लाभत आहे.

मराठी चित्रपट, नाटक, मनोरंजन विश्वाला युनायटेड किंगडममध्ये चांगले व्यासपीठ मिळवून देणे हा ‘बाराखडी एंटरटेनमेंट’च्या स्थापनेमागचा उद्देश असल्याचे अमोघ धामणकर, गंधार बाबरे यांनी सांगितले. नाटक, स्टेज शो, चित्रीकरण, टीव्ही शो, पारितोषिक वितरण सोहळे अशा सर्व गोष्टींसाठी हे व्यासपीठ ते उपलब्ध करून देणार आहेत.

युनायटेड किंगडम मध्ये (इंग्लंड, वेल्स्, स्कॉटलंड, नॉर्दर्न आयर्लंड) साधारण १o हजार इतके मराठी रसिक राहतात. त्यांच्या पर्यंत विविध उपक्रमाद्वारे पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘रिझर्व्ह बँक’ व ‘सेबी’ फक्त “दुर्वा” उपटतात काय ?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ( आरबीआय) सर्व बँकांची नियामक...

गरीबाच्या मुखी दुध जाहले महाग …आता गाईचे दूध 58 रुपये तर म्हशीचे दूध 74 रुपये लिटर

पुणे - भेसळीच्या पनीर ने राज्यात उच्छाद मांडला असताना...

संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये बेवड्यांनी लावली आग:अर्धा हेक्टर जंगल जळून खाक

मुंबई-मुंबईच्या बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये बेवड्यांनी आग...

महाबळेश्वर पर्यटन: कार पसरणी घाटात १०० मीटर दरीत कोसळून भीषण अपघात

पुणे- लोणी काळभोर येथील तरुण महाबळेश्वर या ठिकाणी फिरण्यासाठी...