५० हजार प्रत्येकी ,मानपत्र प्रदान
पुणे : पलूस (सांगली )च्या पुरात ६ दिवस ३०० जणांना वाचविणारे मच्छीमार बंधू एजाझ अहमद पठाण, हसन अब्दुल पठाण यांना अवामी महाज ‘संस्थेच्या वतीने ‘ फक्र_ ए- महाराष्ट्र ‘ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

राज्याचे माजी अल्पसंख्यक विकास मंत्री मोहमद अरिफ नसीम खान यांच्या हस्ते ‘फक्र -इ -महाराष्ट्र ‘ पुरस्कार पुणे फेस्टिव्हल मधील ‘मुशायरा ‘ कार्य्रक्रमात दिले गेले. प्रत्येकी ५० हजार रुपये , सन्मानचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे . ‘अवामी महाज’चे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सभागृहात ‘ पुणे फेस्टिव्हल ‘ चे संस्थापक सुरेश कलमाडी उपस्थित होते.
‘पुणे फेस्टिव्हल ‘ उर्दू ,हिंदी शेरोशायरीचा आंतरराष्ट्रीय मुशायरा आयोजित करण्यात आला होता, त्याला जोरदार प्रतिसाद मिळाला. मोहरम आणि गणेशोत्सवाच्या महिन्यात झालेल्या ‘ पुणे फेस्टिव्हल ‘ कार्यक्रमात गंगा -जमुना तहजीबचे ,हिंदू -मुस्लिम सलोख्याच्या परंपरेचे दर्शन घडले आणि मुशायरा संस्मरणीय ठरला.
‘अवामी महाज’ सामाजिक संस्था आणि इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलकडून आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी रात्री दहा वाजता हा कार्यक्रम गणेश कला क्रीडा केंद्र(स्वारगेट) येथे झाला.उद्घाटन राज्याचे माजी अल्पसंख्यक विकास मंत्री आरिफ नसीम खान यांनी केले
अरिफ नसीम खान म्हणाले, ” सर्व धर्मसमभाव, एकात्मतेला नजर लागली आहे. त्याबद्दल विचार करायला कोणाला वेळ नाही, ही चिंतेची बाब आहे. या देशाच्या हिंदू – मुस्लीमांमध्ये दुरी उभी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्यांविरूध्द लढा देण्याची गरज आहे. देशाला बरबाद करणाऱ्यांना सरदार म्हणता येणार नाही ”

पॉप्युलर मेरठी(मीरत),मंझर भोपाली(भोपाळ),इक्बाल अशर(दिल्ली ),अफरोज आलम(दुबई),अतुल अजनबी (ग्वाल्हेर),रियाझ सागर (मुझफ्फर नगर ),शाहीद अदिली (हैद्राबाद),शाईस्ता सना(कानपूर),डॉ मुमताज मुनव्वर (पुणे),अंजली अदा(काश्मीर),रेहाना शाहीन (अलीगड),शर्फ नानपर्वी(दिल्ली) हे शायर कवी सहभागी झाले .इक्बाल अन्सारी ,डॉ मेहताब आलम(भोपाळ) यांनी सूत्रसंचालन केले.
पुणे फेस्टिव्हल मधील हा मुशायरा १९९२ पासून सुरु आहे आणि पुण्यातील गणेशोत्सवातील मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सहभाग या कार्यक्रमात असल्याने या मुशायऱ्याला दोन्ही समाजातील स्नेह आणि सलोख्याचे प्रतीक मानले जाते .
एस ए इनामदार ,डॉ. सतीश देसाई, अभय छाजेड, सुरेश ( काका ) धर्मावत ,वाहिद बियाबानी , इम्तीयाझ मुल्ला , डॉ. मुश्ताक मुकादम,लतीफ मगदूम उपस्थित होते.
मुशायऱ्याच्या आयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली होती, त्यात डॉ परवेझ इनामदार,डॉ मुश्ताक मुकादम ,वाहिद बियाबानी ,इम्तियाझ मुल्ला ,प्रा . उझ्मा तस्नीम यांचा समावेश होता .