आधुनिक तंत्राद्वारे ‘ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशन ‘ चा २५ कुटुंबाना मदतीचा हात
पुणे :ग्रामीण भागातील पाणी आणण्याचे कष्ट वाचविण्यासाठी ट्री इनोव्हेशन फाउंडेशन तर्फे ‘नीर चक्र ‘ ही पाणी वाहून नेणारी आधुनिक ढकलगाडी पुरंदर तालुक्यातील २५ गरीब कुटुंबाना देण्यात आली . या आधुनिक तंत्राद्वारे ‘ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशन ‘मदतीचा हात दिला मिळाला . फाउंडेशनचे प्रमुख तन्वीर अस्लम इनामदार यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली .
एका वेळी ८० लिटर पाणी वाहून देणाऱ्या या तीनचाकी ‘नीरचक्र ‘ ला वॉटर फिल्टर ,गायरोस्कोपिक स्टॅबिलायझर ,ब्रेक ,नळाची तोटी आहे .
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार यांनी या प्रकल्पासाठी १ लाख रुपयांची मदत केली आहे . तन्वीर पी . इनामदार यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .हा कार्यक्रम रविवारी झाला