जिल्हास्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत आझम कॅम्पस विजयी
पुणे :
जिल्हा क्रीडा परिषद आणि पुणे पालिकेचा शिक्षण विभाग आयोजित जिल्हास्तरीय सॉफ्ट बॉल स्पर्धेत आझम कॅम्पस ने विविध गटात विजय मिळवला . १९ वर्षाखालील मुलींच्या गटात आबेदा इनामदार कनिष्ठ महाविद्यालयाने मॉडर्न कनिष्ठ महाविद्यालयाचा १-० होमरनने पराभव केला . १७ वर्षाखालील मुलांच्या गटात अँग्लो उर्दू हायस्कुल -कनिष्ठ महाविद्यालयाने सेंट व्हिन्सेंट संघाचा १५-३ होमरनने पराभव केला . १४ वर्षाखालील मुलांच्या गटात एम .सी . एस . इंग्रजी माध्यम प्रशालेने मॉडर्न महाविद्यालय शिवाजीनगर चा ८-१ होमरनने पराभव केला .१४ वर्षाखालील मुलींच्या गटात एम .सी . एस . इंग्रजी माध्यम प्रशालेने मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड चा १५-४ होमरनने पराभव केला
विजयी संघांचे पी ए इनामदार ,आबेदा इनामदार ,लतीफ मगदूम ,गुलझार शेख यांनी अभिनंदन केले