कोकण किनाऱ्यावर कोळथरे (दापोली ) येथे १ एप्रिल पासून ‘कासव जलार्पण ‘ सोहळा !

Date:

पुणे :कोकणमधील  कोळथरे (तालुका दापोली ) येथील समुद्र किनाऱ्यावरील संरक्षित घरट्यातून कासवाची पिले समुद्रात सुरक्षितपणे सोडण्याचा ‘जलार्पण ‘ सोहळा १ एप्रिल पासून होणार असल्याची माहिती ‘कोळथरे पंचक्रोशी विकास मंडळ ‘ चे अध्यक्ष दीपक महाजन यांनी पत्रकाद्वारे दिली .
कोळथरे गावात सन २००५  पासून कासव संवर्धन प्रकल्प वन विभाग ,निसर्गप्रेमी आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने चालवला जात आहे . त्यास   ‘सहयादी निसर्ग ‘ संस्थेचे भाऊ काटदरे,’आगोम ‘चे  महाजन , केदार तोडणकर,  प्रवीण  तोडणकर   यांची साथ  लाभली आहे.कासवांची सर्वाधिक २३ घरटी या समुद्र किनारी संरक्षित करण्यात आली आहेत .
 घरट्यामध्ये  कासवाने घातलेली सुमारे ३५५० अंडी  ठेवण्यात आली आहे. या घरट्यांमधून लवकरच पिले बाहेर पडून समुद्राकडे धाव घेणार आहेत .
त्यांच्या या नैसर्गिक ओढीचा सोहळा  निसर्ग प्रेमींना पाहायला मिळणार आहे.  महाराष्ट्र शासनाचा वनविभाग, वनक्षेत्रपाल सुरेश वरप , वनरक्षक श्री वडार , सह्याद्री निसर्ग मित्र ‘चे  भाऊ काटदरे आणि  ‘कोळथरे पंचक्रोशी विकास मंडळ ‘   यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
 सर्वसाधारणपणे कोळथरे किनाऱ्यावर  अंड़ी घातल्यापासून ५२ ते ५५ दिवसात पिले  बाहेर येतात ,
कोळथरे किनाऱ्यावर  वर्षी १  ते 3 एप्रिल  , ९ एप्रिल ते १० एप्रिल, २९ एप्रिल ते १ मे  या दिवशी कासव पिल्लाचा जलार्पण सोहळा आयोजित केला जातो . पर्यटक हा सोहळा पाहायला येतात . या कालावधी मध्ये सकाळी ६ वाजता आणि सायंकाळी ६ वाजता आलेल्या पिलाना त्यांच्या  अधिवासात म्हणजेच समुद्रामध्ये  सोडण्यात येणार आहे,
ज्यांना हा सोहळा पाहायचा असेल त्यांनी नोंदणी साठी   ७७७५८५३४५६, (०२३५८) २८५२२२ /२३
या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन , दीपक महाजन यांनी केले  आहे.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बोपोडीत ३०० खाटांचे शासकीय रुग्णालय व्हावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी

'ससून' ची विश्वासार्हता जपणे गरजेचे -पश्चिम महाराष्ट्रातील अनेक रुग्णांची...

रेशन माफियांवर कडक कारवाई करूनशासनाने जरब बसवावी-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : गरीब, सामान्य नागरीकांसाठी असलेले रेशन वरील धान्य...

पुण्यातील रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता पुणे-मुंबई, पुणे-बेंगळुरू, पुणे-हैदराबाद या...

तर तेव्हा फडणवीस जनसंघी अनुयायांसह ‘मुग गिळुन’ गप्प का होते..?

मुंबई -दि २६ फेब्रू २०२६-काँग्रेस काळात मोगलांचा इतिहास १७...