रॉयल ट्विंकल -सिट्रस कंपन्यांच्या मध्ये गुंतवणुकीच्या पोलीस तपासात दिरंगाई

Date:

पुणे :रॉयल ट्विंकल -सिट्रस कंपन्यांच्या मध्ये गुंतवणुकीत फसवणूक प्रकरणाच्या पोलीस तपासात आणि फसवणूक करणाऱ्या ओमप्रकाश गोयंका,सर्व डायरेक्टर व त्यांचे कुटुंबीय,उप कंपन्या यांच्या मालमत्ता संरक्षित अथवा जप्त करण्याच्या प्रक्रियेत दिरंगाई होत असल्याचा आरोप आज ‘रॉयल ट्विंकल- सिट्रस इनवेस्टर्स  फोरम ‘ च्या वतीने पत्रकार परिषदेत गुंतवणूकदारांनी केला .
सरकारी  तसेच पोलीस विभागातील अडथळ्यांची माहिती देण्यासाठी  ‘रॉयल ट्विंकल सिट्रस इन्व्हेस्टर्स  फोरम ‘ च्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते  .
पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या या पत्रकार परिषदेला श्री.घनश्याम जोशी,संदीप शहा ,सी बी भाट्ये,सौ प्रविणा जोशी,सौ.राजश्री गाडगीळ आदी पदाधिकारी उपस्थित होते .
सिट्रस चेक इन्स लिमिटेड ,रॉयल ट्विंकल स्टार क्लब प्रा.लि. व लि.आणि ट्विंकल एन्व्हायरो टेक लि . या कंपन्यांचे सर्वेसर्वा ओमप्रकाश गोयंका व इतर यांनी सामान्य गुंतवणूकदारांची ११ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक लुबाडल्याने २०लाख गुंतवणूकदार देशभरात अडचणीत सापडले आहेत .
 या प्रकरणी गुंतवणूकदारांनी केलेल्या तक्रारी आणि पाठपुराव्याने गोयंका व दोन संचालक, नाशिक येथे सध्या अटकेत आहेत . मात्र ,त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यात पुणे पोलीस दिरंगाई करीत आहेत.गोयंका आणि त्यांच्या कंपन्यांच्या सर्वात जास्त जमिनी व मालमत्ता पुणे जिल्ह्यात आहेत .
 गेली २० वर्षे गोयंका व तीन संचालक,दर 3/4वर्षांनी कंपनी चे नाव बदलून,आर ओ सी,सेबी यांना फ़सवून  सामान्य गुंतवणूकदारांकडून टाईम शेयर च्या माध्यमातून कायदेशीर आहे असे भासवून कलेक्टिव इन्व्हेस्टमेन्ट स्कीम’,साखळी गुंतवणूक प्रकारा खाली या कंपन्या बिनबोभाट मोकाटपणे पैसे गोळा करीत होत्या,त्यावर सेबी ने अन्कुश ठेवलाच नाही.त्याचे परतावे थकल्याने गुंवणूकदार आणि एजेंट यांनी सेबी तसेच पोलिसात तक्रारी दाखल केल्या.
 पुण्यात आर्थिक गुन्हे शाखे कडे 350 लोकांचे वतीने साधारण अडीच वर्षांपूर्वी पासुन पाठपुरावा केल्यावर, एक वर्षा पूर्वी FIR विथ  MPID गुन्ह्याची EOW कडे नोंद केली गेली
गोएंकाने ट्विन्कल/मिराह ग्रुप अन्तर्गत 88कंपन्या व रु.3555 कोटींच्या मालमत्ता नची यादी कोर्टात सादर केली आहे.तसेच आम्ही
गुंतवणूकदारांनी पाठपुरावा -तपास करून गोयंका यांच्या ग्रुप अन्तर्गत आणखी १२८ कंपन्या,तसेच भारतभरातील १३० मालमत्ता शोधून दिल्या.त्यातील फक्त ४७ मालमत्ता शासनाने संरक्षीत केल्या.आश्चर्य म्हणजे सेबी ने टोकल्यावर रॉयल ट्विन्कल स्टार बंद केली व त्याच 4 संचालकांनी सिटृस चेक इन्ंस कंपनी 2011साली नोंदवली गेली,त्यावेळी चे प्रमोटर गोएंका व 3संचालकां चे साथीदार असलेले आणखी 3 “प्रमोटर म्हणजे “श्री.भोजने,श्री.महादे,व श्री घाडगे यांच्या पत्नी सौ अनिता लहू घाडगे,व ह्यांनीच 20वर्षे गोएंका व संचालकांना, एकूण गोळा केलेल्या रकमे पैकी 70%रक्कम ह्या तिघांनी गोळा करुन साथ दिल्यावर,आता  सिटृस वेल्फेअर सोसाइटी स्थापन करुन सुप्रीम कोर्टात खटले भरले आहेत ,व एजंट लोकांकडून देणग्या गोळा करुन सिनीअर वकील शाम दिवाण यांना एजंट कडून देणग्या गोळा करुन फी देत आहेत,जे दिवाण वकील ,गोएंका च्या मेसर्स ट्विन्कल रियलटर्स प्रा.लि.म्हणजेच आत्ताची मिराह रियलटर्स् प्रा.लि. ह्या कंपनी च्या विरुध्द निलेश कानडे ग्रुपने टाकलेल्या, 2011ते 2015साला पर्यंत चालू असलेल्या केस चे काही  पुरावे हाती लागले आहेत. सदरहू कारणा मुळेच वरील सिटृस वेल्फेअर सोसाइटीने  मुंबईतील आर्थिक गुन्हे विभाग येथे जाण्याचे टाळले आहे व एमपीआयडी  तसेच मंत्रालय मुंबई अशा सरकारी ठिकाणी कामकाज सुरु आह,गृह राज्य मंत्री,मुख्य मंत्री (व गृहमंत्री) तसेच केंद्रीय रस्ते वहातूक मंत्री यांची समक्ष भेट घेऊन,तसेच PMO कार्यालयाला ही तातडिने आवश्यक पावले उचलावीत अशी विनंती पत्रे टाकली आहेत,शिवाय समक्ष भेटिगाठी घेतोय,पण म्हणावे तसे आशादायक चित्र नाही
गोएंका ने सुप्रीम कोर्टाच्या 9.11.16 रोजीच्या 6महीन्यात पुरवणी अर्ज करण्याच्या आदेशाला तर डावलले आहेच,उलट 2.5.2017रोजी अडाणी अशिक्षीत सायली राणे ,व सांमान्य नोकरदार एकनाथ आहेर यांच्या अर्जावर दिवाळ्खोरी NCLT कडून लादून घेतली,दिवाळखोर तद्न्य अहमदाबाद हून मागवला,त्या तद्दन्य देवेंद्र जैन यांनी गुंतवणूक दारांची सर्व मुळ प्रमाणपत्रे ताब्यात घेतली आहेत,तसेच दिवाळखोरी च्या काळात काही गुंतवणूकदारान्ं च्या खात्यात पैसे ही वाटलेत.
पुणे जिल्ह्यात सर्वाधिक गुंतवणूक असताना ती ताब्यात घेण्यात पुणे पोलीस दिरंगाई करीत आहे .या गुंतवणुकीचे पुरावे गुंतवणूकदारांनी मिळवून पोलिसांना दिले आहेत,त्या संरक्षित न करता त्या विकण्याचा घाट काही जण करीत आहेत व ही गोष्ट ही वरिष्ठांच्या नजरेस आणून दिली आहे.
‘रॉयल ट्विंकल सिट्रस गुंतवणूकदार फोरम ‘ हा मंच  गुंतवणूकदारांनी एक वर्षांपूर्वी स्थापन करून पोलीस ,कोर्ट ,सेबी ,मुख्यमंत्री अशा पातळ्यांवर आवाज उठवून पाठपुरावा सुरु ठेवला आहे . केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही भेट  गुंतवणूकदारांनी घेतली .पुण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत . आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग,मुंबई येथे तपास चालू आहे . मात्र ,तेथे मनुष्यबळ अपुरे असल्याने तपास पुढे सरकत नाही . मुख्यमंत्र्यांनी तपास अधिकारी नेमल्यावर काही प्रगती झाली .मात्र ती समाधानकारक नाही .
मालमत्ता जप्त न झाल्यास त्या विकल्या जाऊन ,गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळणे दुरापास्त होणार आहे ,याची कल्पना मुख्यमंत्र्यांना देण्यात आली आहे . सेबी या नियामक संस्थेने तर कंपन्या CIS खाली येत असल्याचा रेपोर्ट 1वर्ष स्वता: कडेच ठेवला(सुप्रीम कोर्टाने मागे पर्यंत सादर केला नव्हता)व हात वर केले.एकट्या पुण्यातच २ ते ३ लाख गुंतवणूकदार ,एजेंट असून त्यांना पोलिसच घाबरवत असल्याने ते तक्रारीसाठी पुढे येत नाहीत . आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग हा आर्थिक गुन्हे संरक्षण विभाग झाला आहे ,आहे असा आरोप या पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे .
पुणे पोलिसांनी अडीच वर्षे तपासासाठी घेऊन अद्याप सर्व मालमत्ता जप्त केल्या नाहीत . पुण्यात 12 हजार तक्रार अर्ज दाखल आहेत . या पार्श्वभूमीवर फोरमने मेळावे घेऊन गुंतवणूकदारांचा मोर्चा पुणे पोलीस आयुक्त आणि विभागीय आयुक्त कार्यालयावर काढला होता . त्यानंतरही तपासाला गती न आल्याने गृह राज्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे  धाव घेण्यात आली होती .
देशभर गुंतवणूकदारांनी एजंटांना धमकावणे ,मारहाण करणे ,मानसिक छळ करणे असे प्रकार सुरु असून अनेक जण आत्महत्येच्या विचारावर आले आहेत . सरकारी अनास्थेमुळे परिस्थिती टोकाला गेली आहे ,याची जबाबदारी सरकारी तपास यंत्रणांवर आहे ,असेही  या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...