‘मतदार जागृती परिषद’ तर्फे २० जानेवारी रोजी पुण्यात सभेचे आयोजन
पुणे :’मतदार जागृती परिषद’या मंचातर्फे २० जानेवारी रोजी मतदार जागृतीसाठी पुण्यात सभेचे आयोजन करण्यात आले आहे . ‘लोकसभा निवडणूक आणि देशासमोरचे आव्हान ‘ विषयावर ही सभा होणार असून अनेक सामाजिक कार्यकर्ते ,विचारवंत ,लेखक ,धर्मगुरू त्यात सहभागी होवून विचार मांडणार आहेत .
डॉ. कुमार सप्तर्षी (संस्थापक-अध्यक्ष युवक क्रांती दल) यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार आहे .
रविवार, दिनांक २० जानेवारी २०१९,सकाळी ११ वाजता एस. एम. जोशी सोशालिस्ट फौंडेशन, पत्रकार भवन शेजारी,नवी पेठ, पुणे येथे ही सभा होणार आहे .
डॉ. विश्वंभर चौधरी (सामाजिक कार्यकर्ते),डॉ. सर्जेराव निमसे (मा. कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड),श्रीरंजन आवटे (युवा लेखक-कार्यकर्ते ),मौलाना निजामुद्दीन (धर्मगुरू),संजय सोनवणी (लेखक, विचारवंत ),सुरेश खोपडे (निवृत्त पोलीस महानिरीक्षक),प्रशांत कोठडीया (मतदार जागृती परिषद) हे वक्ते सहभागी होणार आहेत .