‘ सौर ऊर्जा आणि इन्व्हर्टर मधील नवे तंत्रज्ञान ‘ विषयावरील चर्चासत्राला चांगला प्रतिसाद

Date:

‘ महाराष्ट्र हा सर्वात जास्त सौर ऊर्जा निर्माण करणारा प्रदेश बनणार ‘ 
पुणे :इनो सोलर एनर्जी प्रा.लि. आणि महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आयोजित ‘सौर ऊर्जा आणि इन्व्हर्टर मधील नवे तंत्रज्ञान ‘ या विषयावरील चर्चासत्राला सोमवारी, दि. १४ जानेवारी रोजी चांगला प्रतिसाद मिळाला.
मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज च्या सुमंत मुळगावकर सभागृहात हे चर्चासत्र झाले.
स्टिफन थिएरफेल्डर ( मुख्य कार्यकारी अधिकारी,रेफूसोल, जर्मनी ),हरप्रीत सिंग धीर ( रेफूसोल, साऊथ एशिया बिझनेस हेड ), महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन चे अध्यक्ष संजय कुलकर्णी ,उपाध्यक्ष प्रदीप कुलकर्णी ,उन्मेश जगताप (मुख्य कार्यकारी अधिकारी, इनो सोलर एनर्जी प्रा.लि. ) उपस्थित होते.अश्वीनी जगताप यांनी स्वागत केले .
इनो सोलर एनर्जी प्रा.लि. प्रामुख्याने ऐनर्जी सेव्हिंग आणी सोलर एनर्जी मध्ये कार्यरत आहे व रेफुसोल, जर्मनी बरोबर त्यांनी सेल्स आणी सर्व्हीसचा करार केला आहे. कंपनी पुण्यामध्ये अद्ययावत सर्व्हीस व टेस्ट सेंटर आस्थापीत करणार आहे, अशी माहिती उन्मेश जगताप,  (मुख्य कार्यकारी अधिकारी, इनो सोलर एनर्जी प्रा.लि. ) यांनी दिली.
स्टिफन थिएरफेल्डर ( मुख्य कार्यकारी अधिकारी,रेफूसोल, जर्मनी ) यांनी ‘ रेफूसोल ‘ अत्याधुनिक जर्मन तंत्रज्ञानाने तयार झालेल्या इन्व्हर्टरची माहिती दिली . ते म्हणाले , ‘भारताला सौरऊर्जेचे वरदान असून गुणवत्तापूर्ण जर्मन इन्व्हर्टर वापरले तर या सौरऊर्जेचा परिणामकारक वापर भारतीयांचे जीवन बदलून टाकेल ‘
हरप्रीत सिंग धीर ( रेफूसोल, साऊथ एशिया बिझनेस हेड ) म्हणाले ,’सौरऊर्जेच्या दूरगामी वापरासाठी गुणवत्तेची हमी देणारी उत्पादने वापरणे हितकारक असते . त्यात तडजोड केली की नंतर ग्राहकालाच त्रास होतो . ‘
संजय कुलकर्णी म्हणाले ,’सौरऊर्जेचे महत्व महाराष्ट्राला पटले असून आगामी काळात महाराष्ट्र हा सर्वात जास्त सौर ऊर्जा निर्माण करणारा प्रदेश बनणार आहे . सौर ऊर्जेचे महत्व आणि किफायतशीरपणा ग्राहकापर्यंत पोहोचविण्यासाठी जागृती निर्माण केली पाहिजे . ‘ या चर्चसत्राला सौर ऊर्जा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते .
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

स्मिता हाईट्स रस्त्याच्या कामास प्रारंभ तर कॅनॉल रोड परिसरातील लेन नं. ३ मध्ये पाईपलाईन चे काम सुरु

पुणे- महापालिकेच्या प्रभाग क्र. ३०, कर्वेनगर-हिंगणे होम कॉलनी मधील...

भारतासह जगभरात इंटरनेटला होऊ शकतो धोका ?

युद्धामुळे होर्मुझमध्ये टाकलेल्या केबल्सना नुकसान होण्याची शक्यता; समुद्रात 97%...