पुणे : दीडशेव्या जयंतीनिमित्त महात्मा गांधींना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी वर्गाची गांधी जयंतीच्या पूर्व दिनी १ ऑक्टोबर रोजी अभिवादन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष डॉ.पी. ए. इनामदार यांनी मिरवणुकीचे उद्घाटन केले. सचिव लतीफ मगदूम यांनी मिरवणुकीचे नेतृत्व केले.
१ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता मिरवणुकीला आझम कॅम्पस येथून प्रारंभ झाला. या मिरवणुकीत पाच हजार विद्यार्थी, प्राध्यापक सहभागी झाले. शहराच्या प्रमुख रस्त्यांवरुन फिरून मिरवणुकीचा समारोप आझम कॅम्पस येथे झाला.
महात्मा गांधी यांच्या शांती, सत्याग्रह ,सलोखा, सहकार, शिक्षण, जीवन विषयक तत्वज्ञानाच्या संदेशांचे फलक विद्यार्थ्यांनी हाती घेतले होते.
शेख मशकूर अहमद, अब्दुल वहाब शेख, डॉ. व्ही.एन. जगताप, प्रा. गफार शेख, प्रा. रबाब खान, प्रा. प्रविण शेख, प्रा. आयेशा शेख, प्रा. गुलजार शेख, प्रा. मजीद सय्यद, प्रा. डॉ. किरण भिसे, प्रा. डॉ. अनिता बेलापूरकर आदी सहभागी झाले होते.
संस्थेतर्फे दर वर्षी छ.शिवाजी महाराज, महंमद पैगंबर, डॉ.आंबेडकर, म.फुले यांना अभिवादन करण्यासाठी मिरवणुका काढल्या जातात.