![विद्यार्थ्यांचा आदर करा, चांगले विद्यार्थी घडवा : डॉ.पी. ए. इनामदार](https://mymarathi.net/wp-content/uploads/2018/09/P_20180905_095110_1.jpg)
विद्यार्थ्यांचा आदर करा, चांगले विद्यार्थी घडवा : डॉ.पी. ए. इनामदार
पुणे :महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीमध्ये शिक्षकदिनी शिक्षक ,प्राद्यापक,प्राचार्यांना ‘टायटन हेलीऑस ‘ या मनगटी घड्याळांची भेट देण्यात आली आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला !
हा कार्यक्रम ५ सप्टेंबर रोजी सकाळी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या पुणे कॅम्प येथील कॅम्पसमधील असेम्ब्ली हॉल मध्ये झाला. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.पी. ए. इनामदार होते .
यावेळी २० प्राचार्य आणि २० शिक्षकांचा ‘डॉ . सर्वपल्ली राधाकृष्णन गुणवत्ता पुरस्कार ‘ देऊन सत्कार करण्यात आला .
संस्थेच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार ,सचिव लतीफ मगदूम ,सहसचिव इरफान शेख ,टायटन हेलीऑस चे मार्केटिंग हेड मयूर पाठक उपस्थित होते .
‘विद्यार्थ्यांचा आदर करा,त्यांना टाकून बोलू नका . आपल्या कौशल्याने चांगले विद्यार्थी घडवा . शिक्षकांच्या थोड्या प्रोत्साहनाने देखील विद्यार्थी जीवनात उत्तुंग कामे करून दाखवतात ‘ असे प्रतिपादन डॉ.पी. ए. इनामदार यांनी केले .
विद्यार्थी ,शिक्षक ,प्राध्यापक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते