‘
माय अर्थ फाऊंडेशन‘,‘सिंहगड युवा फाऊंडेशन‘आणि ‘शिवोदय मित्र मंडळ‘ संयुक्तविद्यमाने आयोजन
पुणे :‘माय अर्थ फाऊंडेशन‘, ‘सिंहगड युवा फाऊंडेशन‘आणि ‘शिवोदय मित्र मंडळ‘ त्यांच्या संयुक्तविद्यमाने पर्यावरण पूरक ‘सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पर्यावरण देखावा’ व ‘घरगुती गणेशोत्सव पर्यावरण देखावा स्पर्धा 2018‘ आयोजित करण्यात आली आहे.
‘पुणे श्रमिक पत्रकार संघ‘ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत अनंत घरत (अध्यक्ष, ‘माय अर्थ फाऊंडेशन‘), मनीष जगदाळे (‘सिंहगड युवा फाऊंडेशन‘), दिनेश भिलारे (‘शिवोदय मित्र मंडळ‘) किशोर राजपूत (पर्यावरण प्रेमी) यांनी ही माहिती दिली.
पर्यावरण पूरक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पर्यावरण देखवा स्पर्धासाठी ११ हजार, ७ हजार, ५ हजार व सन्मानचिन्ह तसेच २ हजाराची ७ उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत.
पर्यावरण पूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धासाठी प्रथम क्रमांक ५ हजार, ३ हजार, २ हजार व सन्मानचिन्ह अशी ३ पारितोषिके आहेत. एक हजार रुपयांची ७ उत्तेजनार्थ पारितोषिके आहेत.
स्पर्धेचे पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून परीक्षण केले जाईल.
नाव नोंदणीची अंतिम तारीख – १७ सप्टेंबर २०१८ आहे.
याशिवाय पर्यावरण जनजागृती श्री गणेशाची सायकल रॅली, पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनविणे कार्यशाळा, श्री गणेश मूर्ती दान व निर्माल्यदान अभियान हे उपक्रमही घेतले जाणार आहे. श्री गणेशाची सायकल रॅली स्पर्धा रविवार दिनांक ९ सप्टेंबर रोजा सकाळी ९ वाजता मित्र मंडळ (पर्यावरण शिल्प) ते कसबा गणपती येथे होईल, अशी माहिती पत्रकार परिषदेदरम्यान देण्यात आली.
नावनोंदणीसाठी संपर्क:
अनंत घरत – 8329906015, दिनेश भिलारे – 7385845663, मनीष जगदाळे – 9921227777

