आबेदा इनामदार कनिष्ठ महाविद्यालयाला विज्ञान प्रश्न मंजुषा स्पर्धेत करंडक
पुणे : ‘आबेदा इनामदार कनिष्ठ महाविद्यालयमध्ये नुकतीच आंतर महाविद्यालयीन विज्ञान प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजित करण्यात आली होती. आबेदा इनामदार कनिष्ठ महाविद्यालयाने ही स्पर्धा 210 गुणांसह जिंकून आबेदा इनामदार करंडक जिंकून विजेते पदाचा मान मिळविला.
या स्पर्धेमध्ये पीसीएमबी (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक, बायोलॉजी) या विषयावर आधारित चार फेर्या घेण्यात आल्या.
या स्पर्धेमध्ये एस.एम. चोक्सी, सरदार दस्तुर, महावीर, सेंट व्हिसेंट, अँग्लो उर्दू बॉईज, आबेदा इनामदार कनिष्ठ महाविद्यालय व एस. व्ही. युनियन ही सात महाविद्यालये सहभागी झाली होती.
एस. एम. चोक्सीने 200 गुणांसह द्वितीय स्थान प्राप्त केले. पारितोषिक वितरणासाठी एम. सी ई. सोसायटी संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, उपाध्यक्ष आबेदा इनामदार, प्राचार्य आयेशा शेख, उपप्राचार्य सय्यद गफ्फार , पयवेक्षिका तसनिम शेरकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
विनिता चड्डा (सेंट अॅन्स स्कूल) व रेश्मा हलदे (एस. व्ही. युनियन कनिष्ठ महाविद्यालय) यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.