पुणे : ‘डॉक्टर्स डे’ निमित्त १ जुलै रोजी सकाळी पुण्यातील सर्व डॉक्टर्स संघटनानी एकत्र येऊन रुग्णांसाठी प्रार्थना केली आणि निरामय आरोग्यासाठी काम करण्याचा संकल्प केला.
रविवारी सकाळी ८ वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, तसेच दत्त मंदिरासमोर सर्व डॉक्टर्स व असोसिएशन्स चे सदस्य यांनी एकत्र येऊन आरती केली. रुग्णांना आराम पडावा, सर्वत्र निरामय आरोग्य राहावे,यासाठी हा उपक्रम केल्याचे साई स्नेह हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक व राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. सुनिल जगताप यांनी यावेळी सांगीतले.
डॉक्टर व रुग्ण यांच्यातील संबंध दृढ होणे यासाठी डॉक्टर्स व असोसिएशन्स चे सदस्य मिळून एकत्र काम करण्याचा संकल्प करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. सुनिल जगताप ,डॉ. मिलिंद भोई, काँग्रेस डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. रवींद्र काटकर, भाजपा डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र खेडकर,जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (जीपीए)चे अध्यक्ष डॉ. प्रवीण दरक,इंडियन मेडिकल असोसिएशन’ (आयएमए, पुणे)चे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, शिवसेना डॉक्टर सेल च्या अध्यक्ष डॉ.सौ. प्रांजली थरकुडे , डॉ.मनोज रांका, डॉ. राजेश पवार, डॉ. सुनील इंगळे उपस्थित होते.
या प्रार्थना उपक्रमामध्ये ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ (आयएमए, पुणे), पुणे डॉक्टर्स असोसिएशन्स (पीडीए), जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (जीपीए), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेल (पुणे), काँग्रेस डॉक्टर सेल (पुणे), आयएमए डॉक्टर असोसिएशन, जनरल प्रॅक्टिस असोसिएशन (पुणे), डॉक्टर्स असोसिएशन्स हडपसर, डॉक्टर असोसिएशन कोथरूड, डॉक्टर असोसिएशन, शिवाजीनगर, सिंहगड डॉक्टर असोसिएशन, भाजपा डॉक्टर सेल (डॉ. राजेंद्र खेडेकर), इंडियन डेंटल असोसिएशन (पुणे) व इतर संघटना सहभागी झाल्या.

