प्रणव मुखर्जींना पुणेरी पगडीची भेट दिली वाघोलीकरांनी !
पुणे :संगीत क्षेत्रातील दिग्गज व्यक्मित्त्वांवर लेखन करणारे युवा लेखक र्हिदम वाघोलीकर यांनी मंगळवारी सायंकाळी दिल्ली येथे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर, गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्यावर स्वतः लिहिलेली पुस्तके भेट दिली. तसेच पुणेरी पगडी भेट दिली. प्रणव मुखर्जी यांनी पगडी आणि पुस्तकांचा स्वीकार करून वाघोलीकर यांच्या लेखन उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी आशय वाघोलीकर हेही उपस्थित होते.
वाघोलीकर यांच्या ‘क्रिएटिंग पॉसिबिलिटीज’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे स्मृतीचिन्ह देऊन या भेटीत माजी राष्ट्रपतींचा गौरव करण्यात आला.
यापूर्वी माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनाही वाघोलीकर यांनी ही पुस्तके भेट दिली होती.
र्हिदम वाघोलीकर हे पुण्यातील २४ वर्षीय युवा लेखक आहेत.
त्यानी गानसम्राज्ञी लता मंगेशकर, गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्यावर पुस्तके लिहिली आहेत. लता मंगेशकर यांच्या भाची रचना खडीकर -शहा या दोन्ही पुस्तकाच्या अतिथी संपादक आहेत.
‘स्वरलता -रिदमिक रेमीनीसेस ऑफ लता दीदी ‘या लता मंगेशकर यांच्यावरील पुस्तक अनोख्या ग्रामोफोन आकारात त्यांच्याच हस्ते प्रकाशित झाले होते, तर किशोरीताईंवरील ‘द सोल स्टिरिन्ग व्हाईस -गानसरस्वती किशोरी आमोणकर’ हे पुस्तक ‘स्वरमंङळ ‘ (इंडियन हार्प) आकारात छापण्यात आले आहे.
या लेखनाबद्दल यापूर्वी र्हिदम वाघोलीकर आणि रचना खडीकर – शहा यांना ’इंटरनॅशनल अचिव्हर्स’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.