डायलिसिस सेंटर हा रुग्णांचा आधार : डॉ. गणेश राक
पुणे :साई स्नेह हॉस्पिटल, मधील डायलिसिस सेंटरचा उद्धाटन समारंभ डॉ. शिवाजीराव पवार ( सहायक पोलीस आयुक्त,स्वारगेट विभाग)यांच्या हस्ते आणि डाॅ.गणेश राक (असिस्टंट कमिशनर इनकम टॅक्स) यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दि.२६ एप्रिल रोजी सकाळी ११वाजता झाला.
कात्रज परिसरातील हे पहिलेच सुसज्ज डायलिसिस सेंटर आहे.
यावेळी नगरसेवक वसंत मोरे,नगरसेविका अमृता बाबर, नगरसेविका मनीषा कदम, राजाभाऊ कदम, नाना जगताप, डॉ. संभाजी कारंडे उपस्थित होते.
वैदेही देवळेकर यांनी स्वागत केले. हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुनील जगताप यांनी प्रास्ताविक केले.साईप्रसाद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले . राजकुमार क्षीरसागर यांनी आभार मानले.
डॉ. शिवाजी पवार म्हणाले, ‘ शरीराची रक्त शुद्धीकरणाची यंत्रणा बिघडली की पूर्ण जीवन उध्वस्त झाल्याची भावना निर्माण होते.डायलिसिसचे उपचार अशा रुग्णांना वरदान ठरते. ही महत्वाची सुविधा कात्रज भागात उपलब्ध झाली , त्याचा उपयोग रुग्णांना होईल.
डॉ. गणेश राक म्हणाले, ‘बदलत्या जीवनशैलीमुळे, आहारातील बदल, प्रदूषण, हार्मोन मधील बदल, मधूमेह अशा अनेक कारणाने मूत्रपिंड ( किडनी ) वर ताण पडतो आणि ते नादुरुस्त झाले की डाय’लीसीस प्रक्रियेद्वारे रक्त शुध्द करणे , हा एकमेव पर्याय राहतो. अशा रुग्णांना डायालीसिस सेंटर हा आधार असतो.
साई स्नेह हॉस्पिटलने ३ दशके कात्रज ची रुग्णसेवा केली आणि उपचार सुविधामधील प्रत्येक आधुनिक गोष्ट उपलब्ध केली ‘ अशा शब्दात नगरसेवक वसंत मोरे यांनी गौरव केला.
साई स्नेह हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुनील जगताप, संचालक डॉ. सुमीत जगताप यांनी स्वागत केले.राजकुमार क्षीरसागर यांनी आभार मानले.

