‘अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस’चा ‘क्विक हिल टेक्नॉलॉजीज’ बरोबर परस्पर सहकार्य करार
पुणे :
‘सायबर सिक्युरिटी’या विषयावर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस’ ने ‘क्विक हिल टेक्नॉलॉजी कंपनी’बरोबर परस्पर सहकार्य करार केला आहे.
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या उपाध्यक्षा आबेदा इनामदार आणि ‘क्विक हिल टेक्नॉलॉजीज’चे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक कैलास काटकर यांनी या सामंजस्य करारावर सह्या केल्या.
‘सायबर सिक्युरिटी’ हा अभ्यासक्रम शालेय पासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांना उपलब्ध करून देणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार, तसेच ‘अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस’चे संचालक डॉ. आर. गणेसन उपस्थित होते.