पुणे : महिला दिना निमित्त धायरीतील पुणे मनपा सुका कचरा प्रकल्पात ‘क्लीन गार्बेज मॅनेजमेंट’ व ‘नागरिकांची पर्यावरण समिती’ च्या वतीने सत्कार कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले. यामध्ये कचरा व्यवस्थापनातील महिलांचा साडी आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
समाजाच्या प्रत्येक संस्था, समूहामध्ये महिलांचा सन्मान आणि सत्कार केला जातो पण असंघटित क्षेत्रातील कचरा वेचक हे दुर्लक्षितच असतात. या क्षेत्रातील स्त्रीया देखील चूल आणि मुल सांभाळून आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतात. कचरा संकलन व वर्गीकरण करून ते आपले उत्तर दायित्व निभावत असतात. यांच्या अमुल्य कार्याकरीता कंपनीतर्फे या महिलांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कंपनीचे सगळे कामगार उपस्थित होते, सूत्र संचलन प्रकाश म्हस्के यांनी केले तर आभार प्रदर्शन सचीन सूर्यवंशी यांनी केले. ‘नागरिकांची पर्यावरण समिती’ तर्फे ललित राठी आणि विवेक खोब्रागडे उपस्थित होते.
‘महिलांना ज्या प्रमाणात कुटुंबात, सामाजिक जीवनात स्थान मिळाले पाहिजे त्या प्रमाणात अजूनही दिले जात नाही याची जाणीव करून देणारा हा महिला दिन असून बदलत्या काळात महिलांच्या प्रगतीचा आढावा घेणारा दिन म्हणून साजरा व्हावे, असे मत ‘क्लीन गार्बेज मॅनेजमेंट कंपनीचे मुख्य संचालक विलास पोकळे यांनी मांडले.

