महिला दिनी ‘गौरीज किचन ‘चा आगळा वेगळा उपक्रम
पुणे :
महिलांनी विद्यार्थीनींसाठी चालविलेल्या ‘अँग्लो उर्दू गर्ल्स कॅन्टीन’ मध्ये ‘महिला दिनी ‘ फर्माइशीच्या प्रत्येक डिश बरोबर पेढे आणि अत्तर वाटप करण्यात येणार आहे !
‘अँग्लो उर्दू गर्ल्स कॅन्टीन’च्या संचालक गौरी बीडकर यांनी ही माहिती दिली . गौरी बीडकर यांच्या ‘गौरीज किचन ‘ या स्टार्ट अप फर्म ने ‘अँग्लो उर्दू गर्ल्स कॅन्टीन’ या महिन्यातच चालविण्यास घेतले आहे . ‘अँग्लो उर्दू गर्ल्स स्कुल आणि आबेदा इनामदार वरिष्ठ मंहाविद्यालय परिसरात असलेल्या या कॅन्टिनवर विद्यार्थिनींची कायम गर्दी असते .हे कॅन्टीन मधील सर्व स्टाफ महिलावर्ग आहे . त्यात कॅन्टीन संचालक गौरी बीडकर,सहायक सुलताना मुलतानी ,आणि मदत करणाऱ्या मीरा अडागळे मावशी यांचा समावेश आहे. शेजारी वसतिगृह असल्याने कॅन्टीन सायंकाळी उशिरा सुरु ठेवा ,रविवारीही चालू ठेवा ‘असा प्रेमळ आग्रह गौरी बीडकर यांना होतो .अशावेळी ओंकार थिटे या युवक सहकाऱ्याची बाहेरून साहित्य आणून द्यायला गौरी बिडकर यांना मदत होते .
या नव्याने जडलेल्या स्नेहापोटी गौरी बीडकर यांनी ८ मार्च महिला दिनी या कॅन्टीन ला फर्माईश सांगणाऱ्या प्रत्येक विद्यार्थिनीचे स्वागत अत्तर लावून आणि पेढा देऊन करणार असल्याचे सांगितले .
कॅन्टीन हे विद्यार्थिनींचे जमून गप्पा मारण्याचे ,सुख -दुःख वाटून घेण्याचे ठिकाण असल्याने आगळ्या पद्धतीने महिलादिन साजरा करण्याचे गौरी बीडकर यांनी ठरवले आहे
पत्रकारितेतून फूड इंडस्ट्रीत पदार्पण केलेल्या गौरी बीडकर भारती विद्यापीठ मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आणि अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कुल अशी २ कॅन्टीन चालवितात आणि तिसऱ्या कॅन्टीनची तयारी सुरु आहे . समाजातील मान्यवरांना घरी निमंत्रित करून उत्तमोत्तम पदार्थ खिलविण्याचा आणि गप्पा मारण्याचा साप्ताहिक उपक्रम त्यांनी सलग ३ वर्षे चालविल्यानंतर त्यांना फूड इंडस्ट्रीत उतरण्याचा आग्रह झाला . आपल्याला चवदार पदार्थ आणि अतिथ्यशीलतेचा वारसा आई अपर्णा भावे यांच्याकडून मिळाल्याचे त्या आवर्जून सांगतात
भारती विद्यापीठ येथे भारतभरातील कॉस्मोपॉलिटन विद्यार्थी -विद्यार्थिनी तर अँग्लो उर्दू हायस्कुल येथे सर्वधर्मीय विद्यार्थिनींना आवडणारे पदार्थ करून देताना खूप शिकायला मिळाले ,असेही त्या म्हणाल्या

