पुणे :‘डॉ. डी.वाय.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ एमसीए अॅण्ड एमबीए’ आयोजित ‘अॅडव्हान्सेस इन कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी अॅण्ड मॅनेजमेंट’ विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन आज शुक्रवारी डॉ. गणेश नटराजन (अध्यक्ष, 5 एफ वर्ल्ड) यांच्या हस्ते झाले.
जगभरातील अनेक संशोधक आणि तज्ञांनी परिषदेत सहभाग घेतला होता.डॉ.डी.वाय.पाटील एज्यूकेशनल कॉम्प्लेक्स आकूर्डी कॅम्पसमध्ये झालेल्या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. मिडऑग्स कुर्मीस (क्लैपेडा युनिव्हर्सिटी, लिथुएनिया), विजोलेट सुलसाने (लिथुएनिया), यान डूक मान (साऊथ कोरीया), मिनवू सेओ (साऊथ कोरीया), सान्ग हॅक ली (साऊथ कोरीया), रॉजर टेलर (डेन्मार्क) उपस्थित होते.एस. के. जोशी, के. निर्मला (संचालक एमसीए विभाग), डॉ. शलाका पारकर (अधिष्ठाता, एमबीए विभाग), यु. आर. देशपांडे आदी मान्यवर उदघाटन कार्यक्रमाला उपस्थित होते.300 प्रतिनिधी आणि संशोधक सहभागी झाले होते आणि 4 पेपर प्रेझेन्टेशन सत्रे आयोजित करण्यात आली.सतेज पाटील (माजी मंत्री आणि अध्यक्ष, डॉ. डी.वाय.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ एमसीए अॅण्ड एमबीए) यांच्या हस्ते गणेश नटराजन आणि डॉ. मिडऑग्स कुर्मीस यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना गणेश नटराजन म्हणाले, ‘सोशल मीडिया, मोबिलीटी, अॅनालिटीक्स, क्लाऊड म्हणजे ‘स्मॅक’चा जमाना आहे. सतत बदल होत आहेत, अनिश्चितता वाढत आहे. अशा परिस्थितीत बदल आत्मसात करुन त्यापालिकडचे अंतज्ञान विद्यार्थांना देण्याचा प्रयत्न विद्यापीठांनी केला पाहिजे.’सतेज पाटील म्हणाले, ‘जागतिक डिजिटल क्रांतीद्वारे प्रचंड क्रांतीकडे वाटचाल सुरू आहे, पण, यामध्ये ग्रामीण भारताला या नव्या संशोधनांची मदत होणे गरजेचे आहे.कविता सुर्यवंशी यांनी आभार मानले.


