आझम कॅम्पसमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रात्यक्षिकांचे सादरीकरण
पुणे:प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलीटन एज्युकेशन सोसायटी’च्या आझम कॅम्पसमध्ये अतिरिक्त पोलिस महासंचालक डॉ. टी.एस. भाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्था नी एम.सी.ई सोसायटी संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी.ए.इनामदार होते.
संस्थेच्या २५ हजार विद्यार्थ्यांनी ध्वजवंदन करून मानवंदना दिली. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. हा कार्यक्रम व्ही. एम. गेनी स्पोर्ट्स ग्राऊंड, आझम कॅम्पस येथे झाला.
संस्थेच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार, सचिव लतिफ मगदुम, सहसचिव इरफान शेख, ‘स्कूल ऑफ आर्ट अॅण्ड आर्ट अॅकॅडमी’च्या संचालक हेमा जैन, प्राध्यापक – शिक्षक वर्ग उपस्थित होता.
आर्ट वॉक अॅण्ड ग्राफिटी वॉल 2017-18’ प्रदर्शनाचे उदघाटन :
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या स्कूल ऑफ आर्ट अॅण्ड आर्ट अॅकॅडमी च्या वतीने वार्षिक ‘आर्ट वॉक अॅण्ड ग्राफिटी वॉल 2017-18’ प्रदर्शनाचे उदघाटन अतिरिक्त पोलिस महासंचालक डॉ. टी.एस. भाल यांच्या हस्ते शुक्रवारी झाले.
यंदाचे प्रदर्शनाचे 10 वे वर्ष होते. हे प्रदर्शन दोन दिवसांसाठी आयोजित करण्यात आले होते. प्रसिद्ध शिल्पकार महेंद्र थोपटे आणि विपुल खटावकर यांच्या शिल्पकलेचे (मातीकाम) प्रात्यक्षिक हे प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरले.