पुणे : श्री गुरुसिंघ सभा गणेश पेठ गुरूद्वारा च्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अमृतसरमधील कीर्तनकारांद्वारे गुरुद्वारामध्ये नुकतेच २३ धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती
विद्यमान विश्वस्त प्रितपालसिंह खंडुजा रणजितसिंह अजमानी, जगजीतसिंह जुनेजा यांनी पत्रकार भवन येथे अलीकडेच झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
श्री गुरुसिंघ सभा गणेश पेठ गुरूद्वाराच्या नवीन विश्वस्त मंडळाने अलीकडेच अबाल वृद्धांकरीता अमृतसर येथील मार्गदर्शक आणि कीर्तनकार यांचे कीर्तन, लंगर (कम्युनिटी किचन) आणि कथांचे आयोजन केले होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. ज्यामध्ये त्यांना धर्माची आणि समाजात कसे वागावे याबाबत शिकवणूक दिली जाते.
अशा कार्यक्रमांचे दर रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी देखील आयोजन केले जाते,
असे
जगजीतसिंह जुनेजा यांनी सांगितले .
श्री गुरुसिंग सभा गणेश पेठ गुरूद्वारा
च्या वतीने वर्षातून एकदा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. तसेच दर रविवारी होमिओपॅथी डॉक्टर यांच्याद्वारे मोफत तपासणी करण्यात येते, असे
रणजितसिंह अजमानी यांनी सांगितले.