‘नमामि चंद्रभागा जलसाक्षरता यात्रेदरम्यान मगरपट्टा सिटी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला भेट
पुणे :
नमामि चंद्रभागा जलसाक्षरता यात्रेदरम्यान मगरपट्टा सिटीच्या स्वयंपूर्ण, अत्याधुनिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला भेट देण्यात आली. यात्रेकरूंनी मगरपट्टा सिटीतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला, बायोगॅस प्रकल्पाला भेट दिली .
माणिक शर्मा यांनी दीड लाख लोकसंख्या असलेल्या मगरपट्टा सिटीची माहिती दिली. सीमा भोसले यांनी कचरा, सांडपाणी व्यवस्थापनाची माहिती दिली.
जलबिरादरी’ चे अध्यक्ष डॉ. राजेंद्रसिंह यांच्या प्रेरणेतून तसेच वित्त आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली जलबिरादरी आयोजित ‘नमामि चंद्रभागा ‘ जलसाक्षरता यात्रेदरम्यान मगरपट्टा येथील कार्यक्रमात यात्रा समन्वयक नरेंद्र चुघ, जलबिरादरीचे संघटक सुनील जोशी, अनिल पाटील, अनिल कानडे, पूजा डोडीया, डॉ. सतीश चव्हाण, सुहास पटवर्धन, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शहरांचे स्वयंपूर्ण कचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प नद्या स्वच्छ ठेवण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावू शकतात, असे सुनील जोशी यांनी सांगीतले.
नरेंद्र चुघ यांनी भीमाशंकर -ते पंढरपूर -विजापूर मार्गावर ११ दिवस चालणाऱ्या ‘नमामि चंद्रभागा’ यात्रेची माहिती दिली.