पुणे- महंम्मदवाडी प्रभाग क्र.26 मधील शिवसेनेचे नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांच्या पुढाकारातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे येथील विरंगुळा केंद्रातील जागेत प्रभागातील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.तसेच विविध माहिती असणारे 2021 या नवीन वर्षाचे कॅलेंडर चे प्रकाशन करण्यात आले.

कोरोना महामारीत वैद्यकीय उपचारासाठी आयुष्य मान भारत योजनेचे कार्ड प्रभागातील नागरिकांना वाटप करण्यात आले.या वेळी जेष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष श्री.म्हेत्रे यांनी कोरोना काळात नगरसेवक भानगिरे यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले.कोरोना काळात प्रभागातील नागरिकांच्या अडीअडचणी नगरसेवक भानगिरे यांनी योग्यरित्या सोडवल्याबद्दल जेष्ठ नागरिक संस्थेने त्यांचे आभार व्यक्त केले.कोरोनाच्या महामारीत अनेक जेष्ठ नागरिक कार्यकर्त्यांचे निधन झाले.अश्या मान्यवरांना या वेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.नगरसेवक नाना भानगिरे म्हणाले, प्रभागातील विरंगुळा केंद्र, उद्याने येथे मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून, चांगल्या प्रकारे सुशोभीकरण, सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील व आपला प्रभाग हा शहरातील सर्वत्तोम प्रभाग कसा बनवता येईल या साठी विशेष प्रयत्न केले जातील असे ते म्हणाले। कोरोनाचे सर्व नियम पाळून या वेळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते..

