पुणे- एकनाथ खडसे यांनी आज शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. समाधान मानण्यावर असतं. काही लोक लिमलेटची गोळी मिळाली तरीही समाधानी होतात. आता राष्ट्रवादी काँग्रेस खडसेंना लिमलेटची गोळी देतात की कॅडबरी हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आज दुपारी २ वाजता खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार होता. त्या प्रवेशा दोन तास अगोदरच आता पाहू काय होतं. नाथाभाऊंना पुष्कळ दिलंय पक्षाने. खडसेंच्या नाराजीवर मार्ग निघाला असता. पण ते काही भाजपात थांबले नाहीत. राष्ट्रवादी काय देतंय पाहू. तुमचे समाधान होईल असे आश्वासन मिळाल्यानंतर नाथाभाऊ नरिमन पॉईंटच्या घरुन बाहेर पडलेत. आता समाधान म्हणजे लिमलेटची गोळीही असते आणि डेरीमिल्कही. राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना काय देणार ते पाहणं महत्त्वाचं असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
जे काही मिळेल त्यामुळे नाथाभाऊ समाधानी होतील का? की काही पर्यायच उरलेला नाही म्हणून जे मिळेल ते स्वीकारतील? असाही प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी विचारला. देवेंद्र फडणवीस यांनी क्लिअर केलं आहे की अश्लील बोलल्यावरही विनयभंगाची केस दाखल होणार नाही का? देवेंद्र फडणवीस हे असं व्यक्तीमत्त्व आहे की जे अनेक प्रकारच्या थपडा खातात पण शांत राहतात. प्रत्येक वेळी तुम्ही आरोप करायचा आणि त्यांनी गप्प बसायचं हे योग्य नाही. भाजपात होणारे निर्णय सामूहिक निर्णय असतात. एकट्या देवेंद्र फडणवीस यांना नाथाभाऊंनी दोष देणं योग्य नाही असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.