गुवाहाटीत पोहोचताच माध्यमानी घेरले- उद्या सकाळी पत्रकार परिषद घेऊन बोलतो म्हणाले ….
मुंबई-शिवसेनेचे एक-एक आमदार बंडखोरांच्या गळाला लागल्यानंतर आता निकटवर्तीय आणि विश्वासू असलेले उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हेही बंडखोर एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत मंत्री म्हणून त्यांचे पूत्र म्हणून फक्त आदित्य ठाकरेच उरले आहेत.विशेष बाब ही की, उदय सामंत हे आदित्य ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत. त्यांचे एकमेकांशी वयक्तिक घनिष्ठ संबंध आहेत तरीही त्यांनी शिवसेनेची स्थिती पाहून शिंदे गटाकडे धाव घेतली. त्यांचे विमानतळावरील फोटोही व्हायरल झाले आहेत.
गुवाहाटीत पोहोचताच सामंत यांनी माध्यमांना , उद्या सकाळी पत्रक्र परिषद घेऊन बोलतो ; असे सांगितले
एकनाथ शिंदे यांच्या गोटातल्या आमदारांची संख्या 47 झालीय. यात शिवसेनेचे 38 आणि इतर 9 आमदार आहेत. यात 8 जण कॅबिनेट आणि राज्यमंत्री आहेत.शिंदे गटातील दोन आमदार कैलाश पाटील आणि नितीन देशमुख हे मात्र परतले आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या गटातील शिवसेना आमदार –
1) एकनाथ शिंदे (मंत्री)
2) अनिल बाबर
3) शंभूराजे देसाई (मंत्री)
4) महेश शिंदे
5) शहाजी पाटील
6) महेंद्र थोरवे
7) भरतशेठ गोगावले
8) महेंद्र दळवी
9) प्रकाश अबिटकर
10) डॉ. बालाजी किणीकर
11) ज्ञानराज चौगुले
12) प्रा. रमेश बोरनारे
13) तानाजी सावंत
14) संदीपान भुमरे (मंत्री)
15) अब्दुल सत्तार नबी
16) प्रकाश सुर्वे
17) बालाजी कल्याणकर
18) संजय शिरसाठ
19) प्रदीप जयस्वाल
20) संजय रायमुलकर
21) संजय गायकवाड
22) विश्वनाथ भोईर
23) शांताराम मोरे
24) श्रीनिवास वनगा
25) किशोरअप्पा पाटील
26) सुहास कांदे
27) चिमणआबा पाटील
28) सौ. लता सोनावणे
29) प्रताप सरनाईक
30) सौ. यामिनी जाधव
31) योगेश कदम
32) गुलाबराव पाटील (मंत्री)
33) मंगेश कुडाळकर
34) सदा सरवणकर
35) दीपक केसरकर
36) दादा भुसे (मंत्री)
37) संजय राठोड
38) उदय सामंत (मंत्री)
एकनाथ शिंदे गटातील अपक्ष आमदार
1) बच्चू कडू (मंत्री)
2) राजकुमार पटेल
3) राजेंद्र यड्रावकर (मंत्री)
4) चंद्रकांत पाटील
5) नरेंद्र भोंडेकर
6) किशोर जोरगेवार
7) सौ.मंजुळा गावित
8) विनोद अग्रवाल
9) सौ. गीता जैन