मुंबई : -चिदंबरम ,त्यानंतर राज ठाकरे आणि आता शरद पवार, अजित पवार यांच्यासह असंख्य नेत्यांना बड़े हादरे देण्यात आल्याने आगामी निवडणुका EVM मशीन वरच होतील ही काळ्या दगडावरची पांढरी रेष मानली जाते आहे .
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी एमआरए पोलीस ठाण्यात ७६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घोटाळ्यामध्ये संबंधित खात्याचे अधिकारी आणि तत्कालीन मंत्र्यांची नावंही आरोपी म्हणून देण्यात आली आहेत. यामध्ये त्यावेळचे कृषीमंत्री शरद पवार यांचे देखील नाव आरोपी म्हणून आले असल्याचे याचिका कर्त्यांचे वकील माधवी अय्यपन यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी पाच दिवसांत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेला दिले होते.