शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधकांचा आक्रमक पवित्रा, कामकाज दिवसभरासाठी तहकूब
नागपूर : हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसही आज गदारोळाने सुरु झाला. शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये मदत देण्याच्या मागणीवरून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला. या दरम्यान बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि भाजापचे औसा मतदारसंघातील आमदार अभिमन्यू पवार यांच्यामध्ये धक्काबुकी झाल्याची माहिती समोर येत आहे. या सर्व गदारोळानंतर विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
सभागृहात जे घडलं ते अत्यंत चुकीचे – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले
सभागृहात जे घडलं ते आजपर्यंतच्या इतिहासात अत्यंत चुकीचं घडलं. एकमेकांच्या अंगावर जाण्याचा कुणाला अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांसमोर बॅनर फडकवणे चुकीचे आहे, सत्ताधारी आणि विरोधकांना मी समज देतो – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले.
- महाराष्ट्रात न पोहोचलेल्या 14,000 कोटींवरून अर्थमंत्र्यांचा माजी मुख्यमंत्र्यांना टोलाकेंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेला 14 हजार कोटी रुपयांचा मदत निधी अद्याप मिळालेला नाही अशी माहिती अर्थमंत्री जयंत पाटील यांनी सभागृहाला दिली. देवेंद्र फडणवीस अवघ्या महिनाभरापूर्वी पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री होते. सर्वोच्च पदावर असताना त्यांनीच ही मदत मिळवण्याचे प्रयत्न करायला हवे होते. याचा पाठपुरावा घेण्यासाठी राज्य सरकारचे एक शिष्टमंडळ पंतप्रधान मोदींची भेट घेण्यासाठी जाणार आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्या शिष्टमंडळासोबत जावे आणि पंतप्रधानांशी यासंदर्भात त्यांनीही चर्चा करावी असा टोला अर्थमंत्र्यांनी लावला आहे.
सभागृहाला माहिती देताना अर्थमंत्री पाटील म्हणाले, “शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी जवळपास 14 हजार कोटी रुपये केंद्र सरकारकडे अडकले आहेत. हा निधी याच वर्षी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिले जाणार होते. राज्य सरकारने आपल्या वतीने 6,600 कोटी रुपये आधीच मंजूर करून जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत वितरीत केले आहे.” याच दरम्यान त्यांनी विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिमटा घेतला. केंद्राकडून हा निधी राज्याला का मिळाला नाही. याचा पाठपुरावा घेण्यासोबत ते पीएम मोदींचे मन वळवण्यात यशस्वी ठरू शकतात. मुख्यमंत्री असताना तर त्यांनी यावर काहीच कारवाई केली नाही असेही पाटील म्हणाले. दरम्यान, राज्य सरकारचे शिष्टमंडळ पंतप्रधानांना कधी भेटणार यासंदर्भात माहिती जारी करण्यात आली नाही.
https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/2467763176816408/