पुणे-“सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना बोनस मिळत असताना मात्र पोलिसांना अनेक वर्षे बोनस मिळाला नाही,हा अन्याय असून पोलिसांना बोनस मिळावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष श्री राजेंद्र कपोते यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्यकडे केली आहे.इतर शासकीय कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा असतो, पोलिसांना मात्र २४ तास ड्युटी असते.रोज १२ ते १५ तास ड्युटी करावी लागते, स्वतःच्या तब्येतीकडे , कुटुंबाकडे दुर्लक्ष होते.शांताव सुव्यवस्थेची जबाबदारी रात्रंदिवस त्यांच्या खांद्यावर असते.याचबरोबर सणसुद, मोर्चे, आंदोलने, मंत्री यांचे दौरे,व्ही.आय.पी व्यक्ती यांच्यासाठी बंदोबस्त, त्याचबरोबर आपत्कालीन संकटे,पाउस, यासाठी पोलिसांना जुंपले जाते.गेल्या कोरोनाकाळात तर सर्व जबाबदारी पोलिसांवर टाकण्यात आली.गर्दीवर नियंत्रण ठेवण्यापासून ते अंम्बुलंस मिळवून देण्यासाठी सर्व कामे पोलिसांना करावी लागली.कोरोनामुळे अनेक पोलिसांना आपला जीव गमवावा लागला.पोलिसांमुळे कोरोंना आटोक्यात आला.महाराष्ट्राच्या सुरक्षेची सर्व भिस्त पोलिसांवर असताना मात्र त्यांना बोनस पासून डावलण्यात येते.पोलिसांना संघटना नसल्यामुळे त्यांना आवाज उठवता येत नाही.तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो.विरोधी पक्ष यावर आवाज उठवतात, मात्र स्वतः सत्तेत आल्यावर सोईस्करपणे हा विषय सोडून देतात.इतर कुठल्याही शासकीय कामात जीवाची जोखीम नसते. मात्र पोलिसांना जीवाची जोखीम घेऊन काम करावे लागते. सर्वांना बोनस मिळत असताना पोलिसांना बावरते बरोबर आहे का? सर्व म्हणतात हे सरकार जनतेचे आहे.तर मग पोलिसांना त्वरित एक महिन्याचा बोनस जाहीर करावा अशी मागणी संघटनेच्या मुख्य कार्यालयात करण्यात आली.यावेळी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
“पोलिसांनाही बोनस मिळावा, महाराष्ट्र प्रदेश पोलिस मित्र संघटनेची मागणी
Date:

